भारतीय संघातील अनेक खेळाडू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्याचबरोबर भारताचे दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर देखील सोशल मीडियावर सक्रिय असतात. इतकेच नव्हे तर सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर देखील इंस्टाग्रामवर नेहमी सक्रिय असते. सारा तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ती विविध पोज देताना दिसली होती.
साराचे इंस्टाग्रामवर 12 लाख पेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत. तर सारा स्वतः 435 लोकांना फॉलो करते. यामध्ये 9 क्रिकेटपटूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे तिच्याबरोबर सातत्याने नाव जोडले जाणाऱ्या शुभमन गिलचाही समावेश आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सारा आणि शुभमनमधील अफेअरच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, काहीदिवसांपूर्वीच शुभमनने तो सिंगल असल्याचे सांगितले होते.
काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर शुभमनला प्रश्न-उत्तराच्या सत्रादरम्यान एका चाहत्यानी प्रश्न विचारला होता की, ‘तू सिंगल आहेस का?’ यावर शुभमनने उत्तर देत म्हटले होते की, ‘हो, मी अजूनही सिंगल आहे आणि येणाऱ्या काही दिवसात माझा रिलेशनशिपमध्ये येण्याचा काहीच प्लॅन नाही.’
या क्रिकेटपटूंना फॉलो करते सारा
सारा ज्या ९ क्रिकेटपटूंना फॉलो करते, त्यामध्ये तिचे वडील सचिन तेंडुलकर, भाऊ अर्जुन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, हरभजन सिंग, हार्दिक पंड्या, सिद्धेश लाड, अजित आगरकर यांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर यामध्ये क्रिकेटपटूंच्या पत्नींचे देखील समावेश आहे. यामध्ये 4 क्रिकेटपटूंच्या पत्नींना सारा फॉलो करते.
सारा फॉलो करणाऱ्या 4 क्रिकेटपटूंच्या पत्नीमध्ये जहीर खानची पत्नी सागरिका घाटगे, हरभजन सिंगची पत्नी गीता बसरा, युवराज सिंगची पत्नी हेजल कीच आणि कृणाल पंड्याची पत्नी पंखुडी शर्मा यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सारा मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघाला फॉलो करते.
सारा सध्या वैद्यकिय क्षेत्रात शिक्षण घेत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिनलाही एकेकाळी जाणवत होता मानसिक दबाव, जवळपास ‘इतकी’ वर्षे लागली नव्हती सामन्यापूर्वी शांत झोप
श्रीलंका दौऱ्यात शिखरसह कोण करणार सलामीला फलंदाजी? ‘या’ तीन युवा फलंदाजाचे आहेत पर्याय
युवराजने पत्नीच्या सांगण्यावरून बदलली हेअरस्टाईल, पाहा नवीन लूकचा व्हिडिओ