---Advertisement---

सरफराज खानकडे मुंबई क्रिकेट संघाचं नेतृत्व, एमसीएनं दिली मोठी जबाबदारी

On: रविवार, ऑगस्ट 4, 2024 2:25 PM
Sarfaraz Khan Ravindra Jadeja
---Advertisement---

यावर्षी भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेद्वारे पदार्पण करणारा युवा फलंदाज सरफराज खानला आता मोठी जबाबदारी मिळाली आहे. सरफराजनं पदार्पणातच मालिकेत चांगली कामगिरी केली होती. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर आता मुंबई क्रिकेट असोसिएशननं त्याला बक्षीस दिलं आहे.

वास्तविक, एमसीएनं सरफराजला मुंबई क्रिकेट संघाचा कर्णधार बनवलंय. सरफराज आगामी बुची बाबू स्पर्धेत मुंबईच्या संघाचं नेतृत्व करताना दिसेल. मुंबईचं कर्णधारपद मिळणं ही सरफराजसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली तो संघाला स्पर्धेत यशस्वी करण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावताना दिसणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशननं बुची बाबू स्पर्धेसाठी 17 सदस्यीय मुंबई संघाची घोषणा केली आहे. सरफराज खानचा लहान भाऊ अष्टपैलू खेळाडू मुशीर खानला देखील या संघात स्थान मिळालं आहे. अशाप्रकारे मुशीर पहिल्यांदाच त्याचा भाऊ सरफराज खानच्या नेतृत्वाखाली मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, मुशीर खाननं अंडर-19 विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली होती. तसेच त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्येही मुंबईसाठी चांगली कामगिरी केली आहे.

सरफराज खाननं या वर्षी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होते. पदार्पण केल्यापासून तो भारतासाठी 3 कसोटी सामने खेळला आहे. या सामन्यांमध्ये त्यानं 3 अर्धशतकांच्या मदतीनं 200 धावा केल्या आहेत. सरफराजनं मालिकेतील आपल्या फलंदाजीनं अनेक दिग्गजांना प्रभावित केलं होतं. आता तो नेतृत्वाच्या माध्यमातूनही सर्वांचं लक्ष वेधून घेऊ इच्छितो.

हेही वाचा –

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात गेला नाही तर? आयसीसीचा ‘प्लॅन बी’ तयार
भारत-श्रीलंका सामन्यात सुपर ओव्हर व्हायला हवी होती, आयसीसीचा नवा नियम अंपायर विसरलेत का?
विराट, धोनीच्या बॅट-जर्सीचा होणार लिलाव, केएल राहुल-अथिया शेट्टीनं उचललं मोठं पाऊल; होतंय कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---