---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेत भारतीय फलंदाजाची बॅट ओकतेय आग!! कसोटीत झळकावले वनडे स्टाईल अर्धशतक

On: शुक्रवार, डिसेंबर 3, 2021 2:31 PM
---Advertisement---

सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे, तर दक्षिण आफ्रिकेत भारतीय अ संघ आणि दक्षिण आफ्रिका अ संघ अनधिकृत कसोटी मालिकेत दोन हात करत आहेत. या मालिकेत भारतीय अ संघातील युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नवदिप सैनीने अप्रतिम गोलंदाजी केली होती, तर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सरफराज खानने तुफानी खेळी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

पहिल्या डावात दक्षिण आफ्रिका संघाने केल्या २९७ धावा
भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ या दोन्ही संघांमध्ये दुसरा अनधिकृत कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका अ संघाला सर्वबाद २९७ धावा करण्यात यश आले होते.

दक्षिण आफ्रिका अ संघाकडून मार्को जेंसंनने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली. तर जॉर्ज लिंडेने ४४ धावांचे योगदान दिले होते. तसेच भारतीय अ संघाकडून गोलंदाजी करताना नवदीप सैनी आणि ईशान पोरेलने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले होते.

प्रत्युत्तरात भारतीय संघाने केल्या २७६ धावा
या धावांचा पाठलाग करताना सरफराज खानने सर्वाधिक ७१ धावांची खेळी केली, तर हनुमा विहारीने ५४ आणि पृथ्वी शॉने ४२ धावांचे योगदान दिले. भारतीय अ संघाचा संपूर्ण डाव २७६ धावांवर संपुष्टात आला होता, तर दक्षिण आफ्रिका अ संघाकडून गोलंदाजी करताना ग्लेंटन स्टरमनने सर्वाधिक ४ गडी बाद केले.

सरफराज खानची वनडे स्टाईल खेळी
सरफराज खान डावात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने हनुमा विहारीसोबत मिळून डाव सावरायला सुरुवात केली. त्याच्या खेळीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने अवघ्या ९५ चेंडूंमध्ये वनडे स्टाईल फलंदाजी करत ७१ धावांची तुफानी खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ८ चौकार आणि २ षटकार मारले होते. तिसऱ्या दिवसाच्या समाप्ती नंतर दक्षिण आफ्रिका अ संघाने १३७ धावांची आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

ऐकावे ते नवलचं! मोबाईल फोनमुळे फलंदाज झाला आऊट, मैदानातील अनोख्या प्रसंगाने वेधले लक्ष

वाढदिवस विशेष: टीम इंडियाची कर्णधार मिताली राजबद्दल ‘या’ खास गोष्टी माहिती आहेत का?

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा होणार रद्द? वाचा विराटने बीसीसीआयकडे काय केली मागणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---