राष्ट्रीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न प्रत्येक भारतीय पाहत असतो. मुंबई रनजी संघाचा धडाडीचा फलंदाज सरफराज खान देखील मागच्या मोठ्या काळापासून राष्ट्रीय संघाकडून पदार्पणाची वाट पाहत आहे. त्याने नुकतेच दिल्ली संघाविरुद्धच्या रणजी सामन्यात हंगामातील तिसरे शतक ठोकले. 155 चेंडूत 16 आणि चार षटकारांच्या मदतीने सरफराजने 125 धावांची खेळी केली. यादरम्यानच सरफराजच्या वडिलांनी एक भावूक किस्सा सांगितले.
सरफराज खान (Sarfaraz Khan) याचे वडील नौशाद (Naushad) यांनी इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना हा किस्सा सांगितला. हा प्रसंग इतका भावूक होता की, नौशाद यांना स्वतःला याचे वाईट वाटले. सरफराज लहान असतानाचा हा प्रसंग आहे, जेव्हा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलका त्याच्यासोबत आणि विरोधी संघाकडून खेळत असायचा. एक दिवस हा छोटा सरफराज त्याच्या वडिलांना येऊन म्हणतो, “अब्बू अर्जुन (Arjun Tendulkar) किती नशीबवान आहे आहे. तो सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. त्याच्याकडे गाडी, आयपॅड आणि सर्वकाही आहे.” सरफराजे हे बोलणे ऐकूण नौसात खूपच वाईट वाटले होते.
माध्यमांशी बोलताना नौशात त्याच्या मुलासाठी काही खास करू शकले नाहीत, म्हणून नाराज होते. पण पुढे त्यांनी असेही सांगितले की, काही दिवसांनंतर सरफराज पुन्हा त्यांच्याकडे आला आणि गळाभेट घेतली. यावेळी सरफराज नौशाद यांना म्हणाला की, “मी खूप नशीबवान आहे. तुम्ही माझ्यासाठी पूर्ण दिवस देऊ शकता. पण त्याचे वडील (सचिन तेंडुलकर) असे करू शकत नाहीत.” नौशात यांनी सांगितलेला हा किस्सा सध्या चांगलाच चर्चेत आहे. मागच्या काही दिवसांपासून सरफराजला भारतीय संघात जागा मिळावी, यासाठी मागणी होत आहे. अशातच आता त्याच्या वडिलांनी हा प्रसंग सांगितल्यानंतर त्याच्याविषयी अधिकच सहानुभूती तयार झाल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर सरफराजविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया चाहते देत आहेत.
भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजे बीसीसीआयने नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघ घोषित केला. ऑस्ट्रेलियन संघ फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने निवडलेल्या 17 सदस्यीय संघात सरफराज खानला जागा मिळाली नाही. (Sarfaraz Khan’s father Naushad shared an emotional story of him)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अवघ्या दोनच दिवसात ‘रॉकस्टार’ जडेजा करतोय कमबॅक! शेवटच्या सामन्यात दिसणार मैदानावर
न्यूझीलंडविरुद्ध वाईटरीत्या जखमी झाला विराट, तिसऱ्या वनडेतून होणार बाहेर? ‘हा’ खेळाडू घेऊ शकतो जागा





