सध्या देशातील सर्वोत्तम बॅडमिंटनपटूंपैकी एक मानला जाणारा सात्विकसाईराज रंकीरेड्डीसाठी २० फेब्रुवारी हा दिवस मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हता. दिल्ली येथे होणाऱ्या 43व्या पीएसपीबी इंटर युनिट बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणारा सात्विकसाईराज रंकीरेड्डीला गुरुवार 20 फेब्रुवारी रोजी खेलरत्न पुरस्कार मिळणार होता. ज्यासाठी त्यांचे कुटुंबही दिल्लीला पोहोचणार होते. परंतु त्यापूर्वी सात्विकसाईराज यांचे वडील काशी विश्वनाथम यांचे वयाच्या 65व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 24 वर्षीय सात्विकसाईराजने त्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी मिळताच स्पर्धा अर्ध्यावरच सोडली आणि घरी निघून गेला.
भारतीय बॅडमिंटन स्टार खेळाडू सात्विकसाईराज रंकीरेड्डीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांचे वडील काशी विश्वनाथम हे निवृत्त शारीरिक शिक्षण शिक्षक होते. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी दिली ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आज सकाळी सात्विक यांच्या वडिलांचे निधन होणे खूप दुःखद आणि दुर्दैवी आहे. सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांचे घर आंध्र प्रदेशातील अमलापुरम येथे आहे. या वर्षी जाहीर झालेल्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराच्या यादीत सात्विकसाईराजचे नावही समाविष्ट होते.
Condolences To Satwik Sairaj Rankireddy and His Family
Om Shanti 💐https://t.co/ImMRXLY94h— Badminton Media (@BadmintonMedia1) February 20, 2025
जर आपण सध्याच्या भारतीय पुरुष दुहेरी बॅडमिंटन जोडीकडे पाहिले तर सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी अव्वल स्थानावर आहे. या जोडीने 2022 मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते, तर त्यानंतर 2023 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही त्यांनी सुवर्णपदक जिंकले. सात्विक आणि चिरागची जोडी सध्या बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा-
IND vs BAN; चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी दुबई स्टेडियम सज्ज! सामन्यापूर्वी पाहा पिच रिपोर्ट
चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! टाॅम लॅथमनं रचला इतिहास, किवी संघासाठी अशी कामगिरी करणारा प्रथमच
NZ vs PAK; न्यूझीलंडकडून पराभवानंतर कर्णधार रिझवान संतापला, म्हणाला “संथ फलंदाजी…..