इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल जगातील सर्वात मोठी व श्रीमंत व्यावसायिक टी20 लीग म्हणून ओळखली जाते. या लीगमध्ये केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नव्हेतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंवर देखील कोट्यावधींची बोली लागते. मात्र, आता आयपीएलपेक्षाही श्रीमंत लीग सुरू करण्याचा घाट सौदी अरेबियाने घातल्याचे समोर येत आहे.
सौदी अरेबिया सरकार व सौदीतील काही व्यावसायिकांना भारतीय क्रिकेटचा जवळून अभ्यास करताना पाहिले गेले आहे. खुद्द सौदी सरकारच क्रिकेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले जातेय. सौदी सरकार आयपीएल व बीसीसीआय यांना आपल्या नियोजनात सामील करून घेण्याची तयारी करत आहे. भविष्यात सौदी अरेबियामध्ये आशिया चषक देखील आयोजित केला जाऊ शकतो. तसेच, आयपीएलमधील सामने देखील आयोजित करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.
या सर्वांपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे सौदीने थेट आयपीएलपेक्षा श्रीमंत लीग सुरू करण्याची देखील तयारी चालवल्याचे बोलले जाते. सौदी क्रिकेटच्या प्रतिनिधींनी आयपीएल संघ मालकांशी याबाबत चर्चा केली असून, त्यांना सौदीत आयपीएलच्या समकक्ष लीग सुरू करायची आहे. यापूर्वी सौदीने फुटबॉल व फॉर्मुला वन रेसिंग यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले. ही लीग खेळण्याचे निश्चित झाल्यास बीसीसीआय भारतीय खेळाडूंना देखील या लीगमध्ये खेळण्याची परवानगी देऊ शकते.
सौदीमध्ये लीग आयोजित करायची झाल्यास त्यासाठी आयसीसीची परवानगी आवश्यक असेल. सौदी आयसीसीचा मुख्य सदस्य नसल्याने ही लीग सुरू करण्यासाठी काही विशिष्ट परवानग्या लागतील. काही दिवसांपूर्वीच आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी सौदी अरेबिया क्रिकेटमध्ये रस घेत असल्याचे म्हटले होते.
(Saudi Arabia Eyeing World Richest T20 League With IPL Teams And BCCI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर आयपीएल फ्रँचायझींची नजर! विश्व क्रिकेटमध्ये होणार मोठी घडामोड
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेपटून लग्नबंधनात, मोठ्या काळापासून रिलेशनमध्ये असलेल्या मैत्रिणीसोबत थाटला संसार