भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आणि किंग्स इलेव्हन पंजाबचा सलामीवीर मनदीप सिंगचे वडील हरदेव सिंह यांचे शुक्रवारी रात्री उशिरा निधन झाले. शनिवारी त्यांच्यावर बस्ती गुज्म स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आयपीएलमध्ये व्यस्त असल्यामुळे व्हिडिओ कॉलद्वारे मनदीप त्याच्या वडिलांच्या अंतिम संस्कारात सहभागी झाला होता. तर पंजाबचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरले होते.
हृदयविकाराचा होता त्रास
हरदेवसिंग यांना दीर्घ काळापासून हृदयविकाराचा त्रास होता आणि त्यांच्यावर मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात शस्त्रक्रियाही करण्यात आली होती, परंतु शुक्रवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि हृदयाचे कार्य थांबले.
हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर फोर्टिसमध्ये मृत्यू
मानदीप शनिवारी (24 ऑक्टोबर) सनराईझर्स हैदराबादविरुद्ध सलामीला गेला. मनदीपचा मोठा भाऊ हरविंदरसिंग जालंधर जिल्ह्यातील कोहलन येथे पशुवैद्यकीय डॉक्टर आहे.
हरविंदर सिंग यांनी सांगितले की, “फोर्टिसमध्ये हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर कालच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, परंतु शुक्रवारी अचानक प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले.”
मनदीपला क्रिकेटपटू म्हणून पाहणे होते वडिलांचे स्वप्न
मनदीपला हा एक महान क्रिकेटपटू म्हणून पाहणे हे वडिलांचे स्वप्न होते. मनदीप देशाकडून क्रिकेट खेळला आहे. या प्रसंगी जालंधरच्या क्रीडा संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी, आमदार, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी हरदेव सिंग यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला.
मनदीपचे वडील स्वतः होते खेळाडू
हरदेवसिंग स्वत: अॅथलेटिक्समध्ये लांब उडी घेणारे उत्कृष्ट खेळाडू होते. ते 1987 मध्ये क्रीडा विभागात रुजू झाले. राज्यात लांब उडी घ्येण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकासह त्यांनी इंटर युनिव्हर्सिटी आणि अनेक राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये राज्याचे नाव उंचावले होते.
पंजाब संघ खेळला काळी पट्टी बांधून
मनदीपच्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंजाबचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानावर उतरले होते.
राणाने आपल्या सासऱ्यानां वाहिली आदरांजली
कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज नितीश राणाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याचे दिवंगत सासरे सुरिंदर मारवाह यांना भावनिक श्रद्धांजली वाहिली. शुक्रवारी कर्करोगाने त्यांचे निधन झाले. अर्धशतक पूर्ण केल्यावर त्याने सुरिंदर नावाची जर्सी दाखविली. आयपीएलने आपल्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरून पुष्टी केली आहे.