पुणे : सुधांशू बॅडमिंटन अकादमी आयोजित एसबीए करंडक सब-ज्युनियर गटाच्या राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत शौर्या माधवी, दक्षायनी पाटील, गाथा सूर्यवंशी, यश्वी पटेल यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पुणे जिल्हा मेट्रोपोलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) सहकार्याने शिवाजीनगर येथील मॉडर्न बॅडमिंटन संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत नागपूरच्या शौर्या माधवीने ठाण्याच्या तन्वी घारपुरेवर २१-१८, २१-१४ अशी मात केली. शौर्याची आता उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या दक्षायनी पाटीलविरुद्ध लढत होईल. दक्षायनीने पालघरच्या प्रांजल शिंदेवर २१-१८, २१-१९ अशी मात केली. गाथा सूर्यवंशीने पुण्याच्या धृती जोशीचे आव्हान २६-२४, २१-२ असे परतवून लावले. गाथाची उपांत्य लढत पुण्याच्या यश्वी पटेलविरुद्ध होईल. यश्वीने आपली शहर सहकारी नाव्या रांकाला २१-११, २१-१४ असे नमविले.
स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत ठाण्याच्या सर्वेश यादवने पुण्याच्या कोणार्क इंचेकरला २१-१०, २१-१० असे, पुण्याच्या वेदांत नातूने पालघरच्या तनय मेहेंदळेला २१-१४, २१-२ असे, नागपूरच्या अमेय नाकतोडेने पुण्याच्या यशवंत साळोखेला २१-९, २१-१८ असे नमविले.
यानंतर स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांच्या गटात पालघरच्या देव रुपारेलिया, नागपूरच्या ऋत्वा साजवन, पुण्याच्या साचेत त्रिपाठी आणि ठाण्याच्या यश सिन्हा यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत देवने पुण्याच्या अवधूत कदमला २१-९, १४-२१, २१-१५ असे नमविले, तर ऋत्वाने पुण्याच्या आयुष अदेयवर २१-१४, १६-२१, २१-१३ अशी मात केली. साचेतने पुण्याच्या ओजस जोशीवर १८-२१, २१-१७, २१-१५ असा विजय मिळवला. यशने हर्षित माहिमकरवर २२-२०, २१-१० अशी मात केली.
निकाल – १५ वर्षांखालील मुली – उप-उपांत्यपूर्व फेरी – दक्षयनी पाटील (कोल्हापूर) वि. वि. रिधिमा सरपटे (नागपूर) १५-८, १०-१५, १५-८, धृती जोशी (पुणे) वि. वि. दर्शिता राजगुरू (नाशिक) १६-१४, ६-१५, १६-१४, गाथा सूर्यवंशी वि. वि. भक्ती पाटील (पुणे) १५-९, १६-१४, यश्वी पटेल (पुणे) वि. वि. रिया विन्हेरकर १५-७, १५-४, तन्वी घारपुरे (ठाणे) वि. वि. दितिशा सोमकुवर (नागपूर) १५-१०, १५-७, नाव्या रांका (पुणे) वि. वि. फिझा अकबानी (पुणे) १५-९, १५-९, शौर्या माधवी (नागपूर) वि. वि. जुई जाधव (पुणे) १५-८, १५-१३, प्रांजल शिंदे (पालघर) वि. वि. अनन्या शिंदे १५-६, १६-१४.
१७ वर्षांखालील मुले – उप-उपांत्यपूर्व फेरी – वेदांत नातू (पुणे) वि. वि. विनय पाटील १५-१२, १५-८, अर्जुन रेड्डी (मुंबई उपनगर) वि. वि. अर्जुन बिराजदार (उस्मानाबाद) १६-१८, १५-१०, १५-१२, सर्वेश यादव (ठाणे) वि. वि. हर्ष कटारिया (नगर) १५-०, १५-८, कोणार्क इंचेकर (पुणे) पुढे चाल वि. आर्यन बिराजदार, तनय मेहेंदळे (पालघऱ) वि. वि. अवधूत कदम (पुणे) १२-१५, १७-१५, १५-११, अमेय नाकतोडे वि. वि. कृष्णा जसूजा १५-१२, १२-१५, १५-१०, यशवंत साळोखे (पुणे) वि. वि. निधीश मोरे १५-११, १५-९, देव रुपारेलिया (पालघर) वि. वि. कयान मजिठिया १५-११, १५-९.
(SBA Cup Sub-Junior Badminton Tournament. Shaurya, Dakshayani, Gatha, Yashvi in semi-final)
महत्वाच्या बातम्या –
जेव्हा धोनी माजी क्रिकेटपटूच्या पत्नीला म्हणालेला, ‘वहिनी मला फक्त 30 लाख कमवायचे आहेत, कारण…’
WIvsIND । पहिल्या कसोटीत कोण करणार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी? ‘असा’ सुटणार प्लेइंग इलेव्हनचा पेच