आयसीसीने सोमवार, 3 सप्टेंबर रोजी महिलांच्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी वेळापत्रक जाहीर केले. भारतीय चाहत्यांसाठी ही चांगली बातमी म्हणावी लागेल की, कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि भारत एकाच ग्रुपमध्ये खेळणार आहेत. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही स्पर्धा सुरू होणार असून चाहते यासाठी आतापासूनच उत्सुक आहेत. भारताला पहिला सामना 12 फेब्रुवारी 2023 रोजी पाकिस्तानसोबत खेळायचा आहे.
पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू होईल. स्पर्धा दोन ग्रुपमध्ये खेळली जाणार असून भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असल्यामुळे चाहत्यांचा उत्साह अधिकच वाढला आहे. पहिला सामना यजमान दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात कॅपटाउनमध्ये खेळला जाईल. विश्वचषकातील दुसरा सामना भारत आणि पाकिस्तानमध्ये पार पडेल. 12 फेब्रुवारी रोजी हा सामना पर्लवर खेळला जाईल.
ग्रुप एकमध्ये पाच वेळचा विजेता संघ ऑस्ट्रेलिया आणि त्यांचा प्रतिस्पर्धी न्यूझीलंड आहे. यजमान दक्षिण आप्रिका संघ देखील याच ग्रुपमध्ये आहे. त्याचसोबत श्रीलंका आणि बांगलादेश यांचा ही ग्रुपमध्ये समावेश केला गेला आहे. ग्रुप दोनमध्ये भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडीज, इंग्लंड आणि आयर्लंड यांचा समावेश आहे. ग्रपुमध्ये प्रत्येक संघ एकमेकांशी एकदा भिडणार असून सर्वोत्तम प्रदर्शन करणारे दोन संघ उपांत्य सामन्यात पोहोचतील.
पाकिस्तानविरुद्ध 12 फेब्रुवारीला खेळल्यानंतर भारताचा दुसरा सामना वेस्ट इंडीजविरुद्ध 15 फेब्रुवारीला असेल. त्यानंतर भारताचा तिसरा सामना 18 फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे. 20 फ्रेब्रुवारीला आयर्लंड भारतीय महिला संघ चौथा आणि ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना खेळेल. 21 फेब्रुवारीला ग्रुप स्टेजचे सामने संपतील आणि 23 फेब्रुवारीला पहिला उपांत्य सामना केपटाउमध्ये खेळला जाईल. दुसरा उपांत्य सामना 24 फेब्रुवारीला केपटाउमध्येच आयोजित केला गेला आहे. अंतिम सामना 26 फेब्रुवारी रोजी केपटाउमध्येच खेळला जाईल.
महिला टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचे वेळापत्रक –
12 फेब्रुवारी – भारत विरुद्ध पाकिस्तान
15 फेब्रुवारी – भारत विरुद्ध वेस्ट इंडीज
18 फेब्रुवारी – भारत विरुद्ध इंग्लंड
20 फेब्रुवारी – भारत विरुद्ध आर्यंलड
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
धक्कादायक! इंग्लंड संघाला पाकिस्तानमध्ये दिले गेले निकृष्ट दर्जाचे अन्न; कर्णधार मोईन अलीचा खुलासा
बिग ब्रेकिंगः टीम इंडियाचा संकट वाढलं, भारताचा मोठा खेळाडू वर्ल्डकपबाहेर