भारतीय क्रिकेट संघाचा मातब्बर अष्टपैलू हार्दिक पंड्या हा सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. पाठीच्या दुखापतीतून पुनरागमन करत त्याने स्वतला एक अष्टपैलू आणि कर्णधार म्हणून सिद्ध केले आहे. त्याने आपल्या नेतृत्त्वाखाली आयपीएल २०२१ मध्ये गुजरात टायटन्स संघाला विजेतेपद मिळवून दिले आहे. तसेच भारतीय संघाच्या प्रभारी कर्णधाराच्या रूपातही तो यशस्वी ठरला आहे. अशात आता न्यूझीलंडच्या माजी अष्टपैलू स्कॉट स्टायरिश यांनी हार्दिकला भारतीय टी२० संघाचा भावी कर्णधार म्हणत त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत.
स्टायरिश (Scott Styris) यांचे म्हणणे आहे की, हार्दिककडे (Hardik Pandya) भारताच्या टी२० संघाचे नेतृत्त्व (Indian T20I Team Captaincy) करण्याचे सर्व गुण आहेत. परिणामी रोहित शर्मानंतर तो भविष्यात नक्कीच भारताच्या टी२० संघाचे नेतृत्त्वपद भूषवू शकतो.
स्पोर्ट्स १८च्या दैनिक खेल समाचारच्या कार्यक्रम ‘स्पोर्ट्स ओव्हर द टॉप’वर बोलताना स्टायरिश यांनी हार्दिकच्या नेतृत्त्व गुणांबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “हा चर्चा करण्याचा रोमांचक विषय आहे. कारण ६ महिन्यांपूर्वी कोणीही या गोष्टीची कल्पनाही केली नव्हती. हार्दिकने सर्वांना प्रभावित केले आहे. फुटबॉल खेळात चारित्र्य आणि व्यक्तिमत्व असलेल्या खेळाडूंना सहसा कर्णधार बनवले जाते, जेणेकरून त्यांना त्यांचे कौशल्य दाखवता येईल. पंड्याबाबतही मला असेच वाटते. त्याच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी दिली पाहिजे, मग वर्तमानकाळात उपकर्णधारपद असो किंवा भविष्यात कर्णधारपद.”
दरम्यान हार्दिकने स्विकार केले होते की, त्याला भारतीय संघाचे नेतृत्त्व करायला आवडते आणि तो भविष्यात भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्यासाठी तयारी करेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी२० सामन्यानंतर हार्दिक म्हणाला की, “होय, का नाही? जर मला भविष्यात संधी मिळाली, तर हे करायला आवडेल. परंतु सध्या आमच्यासमोर विश्वचषक आहे आणि आशिया चषक देखील येत आहे. आम्हाला त्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.”
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
झिम्बाब्वे दौऱ्यात ‘या’ खेळाडूचे भारतीय संघात पदार्पण नक्की, तर वनडे विश्वचषक असेल लक्ष्य
चेंडू षटकारासाठी बाउंड्रीपार जाणारच होता, पण हेटमायरने हवेत झेपावत पकडला झेल; पाहा तो अद्भुत कॅच