सध्या भारतीय क्रिकेट संघामध्ये नेतृत्वाचे अनेक पर्याय दिसून येत आहेत. मागील वर्षभरात भारताने जवळपास ७ कर्णधार बदललेत. यामध्ये विराट कोहलीपासून हार्दिक पनड्या यांचा समावेश आहे. त्याचवेळी न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू स्कॉट स्टायरिश याच्यामध्ये श्रेयस अय्यर हा भारताचा भविष्यात कर्णधार होण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे.
काय म्हणाला स्टायरिश
एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना न्यूझीलंडच्या या दिग्गजाने अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. आगामी वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत श्रेयस अय्यर याच्यासाठी अखेरची संधी आहे का? की त्याला आणखी संधी मिळणार? असा प्रश्न विचारला गेला होता. त्यावर उत्तर देताना स्टायरिश म्हणाला,
“खात्रीशीरपणे त्याला आणखी संधी मिळतील. मला त्याच्यातील एक गोष्ट आवडते ती म्हणजे त्याच्याकडे असलेले नेतृत्वगुण. भविष्यात मी त्याला भारताचा कर्णधार म्हणूनही पाहतोय. त्यामुळेच मला आशा आहे की त्याला अधिक संधी मिळेल.”
त्याने जसे श्रेयसचे कौतुक केले तसेच त्याची एक कमजोरी देखील सांगितली. स्टायरिशने म्हटले,
“त्याच्यामधील एक गोष्ट जी मला आवडत नाही ती म्हणजे आखूड टप्प्याच्या चेंडूंवर त्याचे फसणे. आता हे लपून राहिले नाही की, तो आखूड टप्प्याच्या चेंडूंवर सहजतेने खेळू शकत नाही. अनेक संघ त्या रणनीतीने त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करतात. त्याने यावर लवकरच पर्याय शोधायला हवा. ही कमजोरी दूर झाल्यास संघात सर्वात पहिले नाव त्याचे असेल.”
भारताचा माजी खेळाडू सुरेश रैना संपूर्ण कारकिर्दीत अशाच गोलंदाजीविरुद्ध खेळताना अडखळला असे देखील त्याने नमूद केले.
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स व कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे श्रेयसने नेतृत्व केले आहे. मात्र, मागील काही काळापासून भारतीय संघासह तो सातत्याने अपयशी ठरतोय. इंग्लंड दौऱ्यावर त्याला याच कारणाने पुरेशी संधी मिळाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
इतर देशातील टी२० लीगमध्ये खेळणार भारतीय क्रिकेटपटू?
‘वनडे क्रिकेट बंद करून टाका…’, माजी पाकिस्तानी दिग्गजाच्या सल्ल्याने उडाली खळबळ
‘वनडे क्रिकेट बंद करून टाका…’, माजी पाकिस्तानी दिग्गजाच्या सल्ल्याने उडाली खळबळ