---Advertisement---

सारा तेंडुलकरची भाऊ अर्जुनकडे व्हिडिओ कॉलवरच रक्षाबंधनाच्या गिफ्टची मागणी, मुंबई इंडियन्सने शेअर केला खास व्हिडिओ

On: सोमवार, ऑगस्ट 23, 2021 1:01 AM
---Advertisement---

भारतभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. परंतु, काही भारतीय क्रिकेटपटूंना हा सण साजरा करता येत नाहीये. काही क्रिकेटपटू हे इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेली ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात व्यस्त आहेत. तर काही खेळाडू युएईमध्ये होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी तयारी करण्यात व्यस्त आहेत. या सर्व क्रिकेटपटूंना रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या बहिणींची आठवण येत असेल. दरम्यान मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनून आहे.

कुठल्याही खेळाडूला किंवा व्यक्तीला घडवण्यात स्त्रीचा मोलाचा वाटा असतो. तसेच एका क्रिकेटपटूला घडवण्यात त्याची बहीण देखील महत्वाची भूमिका बजावत असते. तीच कुटुंबातील इतर सदस्यांची समजूत काढत असते की, त्याला अभ्यास करण्यासोबत क्रिकेट देखील खेळू द्या. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी याच क्रिकेटपटूंनी घरापासून हजारो किलोमीटर दूर असताना देखील आपल्या बहिणींना व्हिडिओ कॉल करून शुभेच्छा दिल्या आहेत. ज्याचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा युवा खेळाडू अर्जुन तेंडुलकर आपली बहीण सारा तेंडुलकरला व्हिडिओ कॉल द्वारे शुभेच्छा देताना दिसून येत आहे.तसेच साराने या दरम्यान अर्जुन कडून गिफ्टची मागणी देखील केली आहे. तसेच याच संघातील खेळाडू अनमोलप्रीत आणि आदित्य तरे यांनी देखील आपल्या बहिणीला व्हिडिओ कॉल द्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी हे खेळाडू भावूक झाल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. व्हिडिओच्या शेवटी अर्जुन तेंडुलकरने मराठीत सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(See how mumbai indians player’s celebrated rakshabandhan, watch video)

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा पहिला टप्प्याच्या अखेरीस खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. ज्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. या स्पर्धेतील उर्वरित सामने येत्या १९ सप्टेंबर पासून युएई मध्ये पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करत आहेत. तसेच मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू युएईमध्ये पोहोचले असून त्यांनी देखील सरावाला सुरुवात केली आहे. यंदा मुंबई इंडियन्स संघ ६ वे जेतेपद जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ही स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघ ८ गुणांसह चौथ्या क्रमांकावर होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

इंग्लंडला बसणार मोठा धक्का? ‘हा’ प्रमुख खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेबरोबरच ऍशेसमधून माघार घेण्याची शक्यता

‘विरुष्का’चं सरप्राईज! लंडनमधील रेस्टॉरंटमध्ये जेवायला जात भारतीय शेफला केलं चकीत

धोनीचा भिडू परतला! आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नई संघासाठी ‘हा’ खेळाडू असेल उपलब्ध

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---