आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तानने पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले. शनिवारी (14 ऑक्टोबर) भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांना सलग तिसरा विजय मिळू शकला नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या लो स्कोरिंग सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याने भारतासाठी धमाकेदार खेळी केली. दुसरीकडे बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. अवघी एक धाव कमी पडल्याने रिझवानचे अर्धशतक हुकले आणि उपस्थितीत चाहत्यांकडून जय श्रीरामची नारेबाजी झाल्याचे पाहायला मिळाले.
भारताला विजयासाठी पाकिस्तानकडून अवघ्या 192 धावांचे आव्हान मिळाले होते. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य 30.3 षटकांमध्ये गाठले आणि विश्वचषक स्पर्धेतील आपला सलग तिसरा विजय नोंदवला. या सामन्यात मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) 69 चेंडूत 49 धावा करून बाद झाला. पाकिस्तानसाठी सामन्यातील ही सहावी आणि महत्वाची विकेट होती. दुसरीकडे उत्साहात असलेल्या भारतीय चाहत्यांनी रिझवान पव्हेलियनकडे परत जात असताना जय श्रीराम-जय श्रीराम अशी नारेबाजी केल्याचे समोर येत आहेत. सोशल मीडियावर याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
Pàkistan batsman Muhammad Rizwan was returning to the pavilion after getting out.
He had to face ‘Jai Shri Ram’ chants from the crowd of Narendra Módi stadium during #IndiaVsPakistan WC today.
Thoughts? pic.twitter.com/IvbpFnE8fh
— Amock (@Politics_2022_) October 14, 2023
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर नाणेफेक जिंकून यजमान संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेला पाकिस्तान संघ 42.5 षटकांमध्ये 191 धावा करून शकला. बाबर आजम 50, तर रिझवानने 49 दावा करून विकेट गमावली. प्रत्युत्तारत भारतासाठी सलामीला आलेल्या रोहित शर्मा याने 63 चेंडूत 86 धावा कुटल्या. रोहितकडून चाहत्यांना शतकाची अपेक्षा होती. मात्र, शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर तो इफ्तिखार अहमदच्या हातात झेलबाद झाला. श्रेयस अय्यर यानेही 62 चेंडूत 53 धावा ठोकल्या. (Seeing Mohammad Rizwan, the crowd chanted Jai Shri Ram)
महत्वाच्या बातम्या –
सुधर रिझवान सुधर! दानिश कनेरियाचे पाकिस्तानला टोचणारे विधान, पोस्ट तुफान चर्चेत
अफगाणिस्तानने केली विजयाची घटस्थापना! गतविजेत्या इंग्लंडला लोळवून दिल्लीत रचला इतिहास, झाला वर्ल्डकपमधील पहिला उलटफेर