मुंबई | फॉर्मात नसल्याने संघाबाहेर असलेला भारताचा अनुभवी फिरकीपटू ‘टर्बनेटर’ हरभजन सिंग याला राष्ट्रीय संघात पुन्हा परतण्याचे वेध लागले आहेत. वयाची ३६ वर्षं पार केलेला हरभजन सिंगला भारतीय संघात परतण्याची आशा बाळगतोय. यासाठी तो खूप मेहनत घेतोय. त्यांच्यामते, टी-20 प्रकारात तो फिट बसू शकतो. तो अनुभवाच्या जोरावर चांगली कामगिरी करू शकतो.
एका संकेतस्थळाशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, आयपीएलमध्ये गोलंदाजी करणे फारच आवघड आहे. येथील प्रत्येक मैदाने छोटी आहेत आणि क्रिकेट खेळणारे खेळाडू दिग्गज आहेत. आयपीलएल स्पर्धेत पावर प्ले मध्ये गोलंदाजीची जबाबदारी चोखपणे पार पाडली. डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयस्टो सारख्या दिग्गज फलंदाजाना बाद करू शकतो तर राष्ट्रीय संघातही चांगली कामगिरी करू शकतो. भारतीय टी- 20 संघात क्रिकेट खेळण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहेत.
आयपीएलमध्ये मुंबईनंतर चेन्नई सुपरकिंग संघाकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या हरभजन सिंगने आतापर्यंत सर्वाधिक गाडी बाद करणार्या यादीत संयुक्तपणे तिसऱया स्थानावर आहे. हरभजनच्या मते, आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू जगातील दिग्गज क्रिकेटपटू आहे. असे गुणवत्तापूर्ण खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही नाहीत.
तसेच चांगली कामगिरी करूनही निवड समिती हरभजनकडे दुर्लक्ष करत असल्याने तो दुःखी आहे. निवड समितीला वाटते की हरभजन हा वयस्कर खेळाडू झाला आहे. तसेच स्थानिक सामन्यातही खेळत नाही. सध्या भारताच्या राष्ट्रीय टी-20 संघात युवा खेळाडू दर्जेदार प्रदर्शन करत असल्याने हरभजनसिंगचे भारतीय संघात ‘कमबॅक’ करणे खूप अवघड आहे.