१९९६ चा इंग्लंड दौरा पाकिस्तानसाठी यशस्वी ठरला होता. कारण, इंग्लंडमध्ये ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्यांनी २-० ने विजय मिळवला होता. कसोटी मालिकेत पाकिस्तानने इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर सलग तिसर्या वेळेस पराभूत केले. एकदिवसीय मालिकेतील मात्र पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवत इंग्लंडने मालिका विजय निश्चित केला. पाकिस्तान व्हाईटवॉश टाळण्यासाठी अखेरच्या सामन्यात नॉटिंघमच्या मैदानात उतरणार होता.
पाकिस्तानसाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये शाहिद अन्वर, शादाब कबीर आणि शाहिद नजीर यांनी पदार्पण केले. नाणेफेक जिंकत इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या निक नाइटने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती केली. दुसर्या बाजूने इतर फलंदाजांची साथ मिळत नसताना नाइटने सलामीला येत अखेरपर्यंत फलंदाजी केली. शेवटच्या चेंडूवर २४६ धावांवर इंग्लंडचा डाव संपुष्टात आला. निक नाइटने अखेरपर्यंत नाबाद राहत १२५ धावांची खेळी केली.
अशाप्रकारे, निक नाइट सलामीला येऊन अखेरपर्यंत नाबाद राहणारा तिसरा खेळाडू बनला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी मात्र आपली भूमिका चोख बजावली होती. वकार युनूस, सकलेन मुश्ताक आणि नवोदित शाहिद नजीर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद तर कर्णधार वसीम अक्रमने तीन गडी बाद केले होते.
मालिकेतील पहिला सामना जिंकण्यासाठी २४७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सईद अन्वर आणि नवोदित शाहिद अन्वरची सलामीची जोडी मैदानात उतरली. दोघांनी ९३ धावांची सलामी दिली. सईदने ५९ चेंडूत नऊ चौकारांसह ६१ धावा केल्या तर शाहिदने ४४ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. इजाज अहमदच्या ५९ धावांनी पाकिस्तान विजयाच्या दिशेने आगेकूच करू लागला. त्याने अमीर सोहेल (२९) बरोबर ६३ धावांची भागीदारी केली. पण, पाकिस्तानचा डाव अचानक १७७/२ वरून २१९/७ असा घसरला. अॅडम होलिओकेने झटपट चार बळी घेत पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले.
परंतु, रशीद लतीफने २८ चेंडूत नाबाद ३१ धावा काढून पाकिस्तानला दोन गड्यांनी विजय मिळवून दिला. पाकिस्तानच्या चार गोलंदाजांनी किमान दोन गडी बाद केलेले तर पाच फलंदाजांनी २५ पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
त्या सामन्यात नऊ खेळाडूंनी एकतर बळी मिळवला होता किंवा 25 हून अधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे, इंग्लंडचा माजी खेळाडू आणि सामनावीर ठरविण्याचा अधिकार असलेला टॉम ग्रॅव्हनीने सर्व ११ पाकिस्तानी खेळाडूंना सामनावीर म्हणून घोषित केले. पाकिस्तानच्या अंतिम अकरामधील फक्त दोन खेळाडू सामन्यात आपला ठसा उमटवू शकले नाहीत. नवोदित शादाब कबीरने एक झेल टिपला परंतु २ चेंडूत शून्य धावांवर माघारी परतला होता. तर, आसिफ मुजताबाने पाच षटकात २७ धावा दिल्या होत्या. तो एकटाच बळी घेण्यात अपयशी ठरला होता.
शादाब कबीर पाकिस्तानकडून ३ एकदिवसीय सामने खेळला. तिन्ही सामन्यात मिळून त्याच्या वाट्याला अवघे पाच चेंडू आले. ज्यामध्ये तो एकही धाव काढू शकला नाही. या तीन सामन्यात त्याने एक षटक गोलंदाजी सुद्धा केली नाही. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील कामगिरी म्हणून शादाबच्या नावापुढे फक्त एक झेल व एक धावबाद यांचीच नोंद आहे. तरीही, शादाबच्या नावे सामनावीर पुरस्कार मात्र आहे.
ट्रेंडिंग लेख –
भारत सोडून या ५ देशाचे सर्वाधिक खेळाडू झाले आहेत आयपीएलमध्ये मालामाल
आयपीएलमध्ये सर्वच संघांकडून पहिली विकेट घेणारे ८ गोलंदाज
हे ३ खेळाडू बनू शकतात आपल्याच आयपीएल संघाचे पुढील कर्णधार
महत्त्वाच्या बातम्या –
मला असं म्हणायचं नव्हतं, रैनाबद्दल मी जे बोललो ते नक्कीच…
डिप्रेशनमुळे १२ महिने क्रिकेट न खेळलेल्या क्रिकेटरने केले जबरदस्त फटकेबाजी
…म्हणून कुलदीप यादव कसोटी पदार्पणावेळी विराटला पहाटे ३ वाजता उठवणार होता