पुणे – स्पोर्टस फौंडेशन पुणेच्या वतीने सिटी एफसीने आयोजित केलेल्या सेव्हन अ साईड फुटबॉल स्पर्धेच्या पाचव्या पर्वात कॉन्स्टलेशन चिताज संघाने ११ आणि १५ वर्षांखालील गटात विजेतेपद मिळविले. मोशी येथील सिटी स्पोर्टस अरेना येथे झालेल्या अंतिम सामन्यात कॉन्स्टलेशन चिताज संघाने दोन्ही सामने २-० अशाच फरकाने जिंकले. कॉन्स्टलेशन चिताज संघाने ११ वर्षांखालील गटात जीएनस गनर्स संघाचा पराभव केला. निर्वाण वानखेडे आणि विहान जरांडे यांनी हे गोल केले.
त्यानंतर १५ वर्षांकालील गटात चिताज संघाने मॅट्रिक मार्व्हल्स संघाचा पराभव केला. आदित्य गावडे आणि अद्वैत मदनगरली यांनी गोल केले. लीगमधील अन्य विजेतेपदांमध्ये ९ वर्षांखालील गटात मॅट्रिक मार्व्हल्सने निरागस नाईटस संघाचा २-० अशाच फरकाने पराभव केला. मार्व्हल्ससाठी माधवनने दोन्ही गोल केले. लीगमध्ये एकाच सामन्यात दोन गोल करणारा माधवन हा एकमेव खेळाडू ठरला.
सक्सेस स्ट्रायकर्स संघाने १३ वर्षांखालील गटात विजेतेपद मिळविले. अंतिम लढतीत त्यांनी आदित्य ऑलस्टार्स संघाचा २-१ असा पराभव केला. नील चव्हाणने स्ट्रायकर्सला आघाडीवर नेले. मात्र, अभय आदिनाथने ऑलस्टार्स संघाला बरोबरी मिळवून दिली. उत्तरार्धात रोहित नलवडने गोल करून स्ट्रायकर्सला पुन्हा आघाडीवर नेले. या वेळी मात्र त्यांनी आघाडी टिकवून ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले. १५ वर्षांवरील गटात विजेतेपद पटकावताना प्रबल पॅंथर्सने सक्सेस स्ट्रायकर्सचा २-१ असा पराभव केला. पॅंथर्सकडून सोहम चौधरी, रिदम मालवीय यांनी गोल केले. स्ट्रायकर्सचा एकमात्र गोल अमित जरेने केला.
निकाल –
९ वर्षांखालील –
अंतिम – मॅट्रिक मार्व्हल्स २ (माधवन १२ आणि १९ वे मिनिट) वि. वि. निरागस नाईटस ०
तिसरे स्थान – डायमंड ड्रॅगर्स १ (अनुज शिरोटे १३वे मिनिट) वि.वि. प्रबल पॅंथर्स ०
११ वर्षांखालील –
अंतिम – कॉन्स्टलेशन चिताज २ (निर्वाण वानखेडे ११वे, विहान जरांडे १७वे मिनिट) वि.वि. जीएनएस गनर्स ०
तिसरे स्थान – निरागस नाईटस १ (अवनीश जोशी १९वे मिनिट) वि.वि. गोल्डन गार्डियन्स ०
१३वर्षांखालील –
अंतिम – सक्सेस स्ट्रायकर्स २ (नील चव्हाण ६वे मिनिट, रोहित नलवाड २३वे मिनिट) विवि. आदित्य ऑलस्टार्स १ (आदिनाथ अभय ११वे मिनिट)
तिसरे स्थान – Diamond Daggers: 1 (Ronit Bhutada 12’) bt Jyoti Jaguars: 0
१५ वर्षांखालील –
अंतिम – कॉन्स्टलेशन चिताज २ (आदित्य गावडे ५वे मिनिट, अद्वैत मदनगरली १८वे मिनिट) वि.वि. मॅट्रिक मार्व्हल्स ०
तिसरे स्थान – टीएमपी टायगर्स १ (आर्यन मासळकर २०वे मिनिट) वि.वि. जीएनएस गनर्स ०
१५ वर्षांपुढील –
अंतिम – प्रबल पॅंथर्स २ (सोहम चौधरी ११वे, रिदम मालवीय १९वे मिनिट) वि.वि. सक्सेस स्ट्रायकर्स १ (अमित जरे १४वे मिनिट)
तिसरे स्थान – ज्योती जग्वार्स ३ (अथर्व रेवळकर ५वे, १५वे मिनिट, अच्युत अभय ९वे मिनिट) वि.वि. आदित्य ऑलस्टार्स १ (प्रथमेश २रे मिनिट)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
घटस्फोटीत महिलांशी लग्न करणारे ५ भारतीय क्रिकेटर्स
कट्टर दोस्त क्रिकेटर पुढे जाऊन झाले एकमेकांचे कट्टर दुश्मन, आज पाहत नाहीत एकमेकांचे तोंड