---Advertisement---

पाकिस्तानला आणखी मोठा झटका! आता हे ७ क्रिकेटपटूही कोरोना पॉझिटिव्ह

On: मंगळवार, जून 23, 2020 7:51 PM
---Advertisement---

जगभरातील अनेक देशांना कोरोना व्हायरसने विळखा घातलेला असताना आता पाकिस्तान क्रिकेटलाही याची झळ बसत आहे. पाकिस्तानचा संघ जूनच्या अखेरीस इंग्लंडला ३ कसोटी आणि ३ वनडे सामने खेळण्यासाठी जाणार आहे. त्याआधी खेळाडूंची आणि सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

यामध्ये सोमवारी शादाब खान, हॅरिस रॉफ आणि हैदर अली या तिघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आता त्यानंतर मंगळवारी आणखी ७ खेळाडूंचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये फखर जमान, इम्रान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान आणि वहाब रियाज हे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

तसेच सोमवारी इमाद वासिम आणि उस्मान शिनवारी यांचा अहवाग निगेटिव्ह आला होता. त्यांच्यानंतर मंगळवारी आबिद अली, असद शफीक, अझर अली, बाबर आजम, फहीम अशरफ, फवाद आलम, इफ्तिखार अहमद, इमाम-उल-हक, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास, नसीम शाह, सरफराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, सोहेल खान आणि यासिर शहा यांचे कोरोना अहवालही निगेटिव्ह आले आहेत.

म्हणजेच इंग्लंड दौऱ्यापूर्वी पाकिस्तानचे आता एकूण १० खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच सपोर्ट स्टाफपैकी मालिशिया मलंग अली हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जे खेळाडू पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यांच्यातील कोणाला कोरोनाची लक्षणे तपासणीपूर्वी आढळून आली नव्हती.

याबरोबरच गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनुस आणि अनुभवी क्रिकेटपटू शोएब मलिकचा अहवाल येणे अजून बाकी आहे. विशेष म्हणजे इंग्लंड दौऱ्यापूर्वी शोएबला भारतात त्याची पत्नी सानिया मिर्झा आणि मुलाला भेटण्यासाठी येण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण आता त्याचा अहवाल काय येतो यावर पुढील सर्व गोष्टी अवलंबून असतील.

याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी हे स्पष्ट केले आहे की पाकिस्तानचे कितीही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले तरी संघ इंग्लंड दौर्‍यावर जाईल. वसीम खान म्हणाले, ‘पाकिस्तानचा इंग्लंड दौरा कायम राहील. टीम २८ जूनला इंग्लंडला रवाना होईल. आम्हाला प्रथम कसोटी मालिका खेळायची आहे आणि कोरोना मुक्त असलेले खेळाडू ट्रेनिंग घेऊ शकतात.’

इंग्लंडला गेल्यानंतरही पाकिस्तान संघाला १४ दिवस क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

ट्रेंडिंग घडामोडी –

ब्रेकिंग- दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच कोरोना पॉझिटिव्ह

दोन वेळा असे झाले! हा गोलंदाज गोलंदाजीला आला व मैदानात मधमाश्यांनी धुमाकूळ घातला

२३ जून २०१३, हा दिवस भारतीय चाहते व खास करुन धोनी फॅन्स कधीच विसरणार नाहीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---