न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वनडे विश्वचषक २०२२ (ICC ODI World Cup 2022) मधील नववा सामना पाकिस्तान महिला संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका (PAKW vs SAW) महिला संघात झाला. दक्षिण आफ्रिकाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ९ बाद २२३ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ४९.५ षटकात २१७ धावांवर सर्वबाद झाला. परिणामी दक्षिण आफ्रिकेने ६ धावांनी सामना जिंकला. या सामन्यातील शेवटच्या षटकात केवळ १० धावांची गरज असतानाही पाकिस्तानला विजय मिळवला आला नाही. त्यांच्या पराभवास जबाबदार ठरली दक्षिण आफ्रिकाची गोलंदाज शबनीम इस्माइल (Shabnim Ismail).
दक्षिण आफ्रिकेच्या या गोलंदाजाने सामन्याअंती एक शानदार झेल (Shabnim Ismail Stinning Catch)टिपला. तिच्या या झेलमुळे पाकिस्तान संघावरील दबाव वाढला आणि संघाला विजयाच्या नजीक जाऊनही त्याची चव चाखता आली नाही.
तर झाले असे की, पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने २२३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ४९ व्या षटकात २०७ धावांवर होता. त्यांना शेवटच्या षटकात विजयासाठी १० धावांची गरज होती. दक्षिण आफ्रिकेकडून शबनीम इस्माइल हे षटक टाकण्यासाठी आली होती. तिच्या या षटकातील पहिल्या चेंडूवर फलंदाज डायना बैगने २ धावा काढल्या.
त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर डायनाने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू तिच्या बॅटच्या कडेला लागल्याने तो मिड विकेटच्या दिशेने जास्त दूर जाऊ शकला नाही. मात्र त्यावेळी मिड विकेटवर कोणतीही खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी उभी नव्हती. त्यामुळे गोलंदाज शबनीमनेच पुढाकार घेतला आणि ती चेंडूकडे पाहात त्याच्यामागे धावत सुटली. पुढे तिने चेंडूचा अचूक अंदाज घेत हवेत शानदार झेलही टिपला.
https://twitter.com/krithika0808/status/1502192305855660033?s=20&t=1QPFPW8VVTF1leZ1rqySIg
शबनीमच्या याच षटकातील पाचव्या चेंडूवर पाकिस्तानने त्यांची दहावीही विकेट गमावली. नुकतीच फलंदाजीला आलेली फातिमा या चेंडूवर धावबाद झाली आणि पाकिस्तानने ६ धावांनी हा सामना गमावला.
हा पाकिस्तानचा विश्वचषकातील सलग तिसरा पराभव होता. यापूर्वी त्यांना भारत आणि ऑस्ट्रेलियानेही पराभूत केले आहे. तसेच पाकिस्तानबरोबर इंग्लंड आणि बांगलादेशलाही विजयाचे खाते उघडता आलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
‘रेकॉर्डतोड’ होणार दिवस-रात्र कसोटी, कर्णधार रोहित आणि उपकर्णधार बुमराहकडेही विक्रमाची संधी
अफलातून! पाकिस्तानी महिला विकेटकीपरचा ‘अद्भूत’ झेल; चाहत्यांंना आली थेट ‘माही’च्या ‘त्या’ कॅचची आठवण