आशिया चषक २०२२ चे बिगूल वाजले असून येत्या २७ ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. टी२० स्वरूपात होणाऱ्या या स्पर्धेतील सर्व सामने संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळले जातील. आशिया चषकाचा सर्वात यशस्वी, भारतीय संघ त्यांच्या आशिया चषक मोहिमेची सुरुवात कट्टर प्रतिद्वंद्वी पाकिस्तानविरुद्ध २८ ऑगस्टपासून करेल. उभय संघातील हा सामना दुबईच्या मैदानावर खेळला जाणार आहे.
युएईतील मैदानांवर खेळण्याचा पाकिस्तानच्या खेळाडूंना भरपूर अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आशिया चषक (Asia Cup 2022) युएईत होणे, ही एक सकारात्मक बाब असेल. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट संघाचा उपकर्णधार शादाब खान (Shadab Khan) याने लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) संघातील महामुकाबल्यापूर्वी शादाबने (Shadab Khan Statement) हुंकार भरली आहे की, पाकिस्तानचा संघ युएईत होणाऱ्या आशिया चषक विजयाच्या इराद्याने उतरेल.
भारताविरुद्ध विजयाचा हेतू घेऊनच मैदानात उतरू
शादाब म्हणाला की, “भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना खूप मोठा असेल. या सामन्यात मी आणि पाकिस्तान संघातील इतर खेळाडू विजयाचा हेतू मनात ठेवूनच मैदानवर उतरू. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू.”
पाकिस्तानच्या अपेक्षांवर भारत फेरणार पाणी
जरी युएईतील मैदाने पाकिस्तानी खेळाडूंच्या ओळखीची असली, तरीही भारतीय संघाच्या आशिया चषकातील आकडेवारीला विसरून चालणार नाही. भारतीय संघाने सर्वाधिक ७ वेळा आशिया चषक जिंकला आहे. त्यातही रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघही चांगल्या लयीत आहे. त्यांनी २०२१ टी२० विश्वचषकानंतर एकही टी२० मालिका गमावलेली नाही.
याशिवाय युएईत भारतीय संघाची आशिया चषकातील कामगिरीही प्रशंसनीय राहिली आहे. युएईत आशिया चषक आयोजला जाण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी ३ वेळा युएईत वनडे स्वरूपात आशिया चषक खेळला गेला आहे. या तिन्ही हंगामात भारतीय संघानेच विजय मिळवला होता. मागील ३८ वर्षांपासून भारतीय संघाचा हा विक्रम अबाधित आहे. अशात रोहितच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघही हा विक्रम कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईची वन फॅमिली बनली ग्लोबल! दक्षिण आफ्रिका आणि युएईतील फ्रॅंचाईजींच्या नावाची झाली घोषणा
रोहित-द्रविड जोडगोळीमुळे फळफळलंय ‘या’ सिनीयर खेळाडूंचं नशीब, एकटा ३ वर्षांपासून होता बाहेर
घरच्या लग्नात फेटा घालून सहभागी झाला मास्टर ब्लास्टर, साराच्या लूकवरही नेटकरी फिदा