संयुक्त अरब अमिरातीतील अबु धाबी टी१० लीगमधील पहिला एलिमिनेटर सामना काही दिवसांपुर्वी झाला. कलंदर्सविरुद्ध झालेल्या या सामन्यात टीम अबु धाबीने ६ विकेट्सने विजयी पताका झळकावली. प्रथम फलंदाजी करताना कलंदर्सने ७ बाद ८३ धावा केल्या. प्रत्युत्तरात ८.४ षटकात ४ विकेट्स गमावत टीम अबु धाबीने हे आव्हान पूर्ण केले. या सामन्यादरम्यान कलंदर्सचा फलंदाज शाहिद आफ्रिदीने दर्शकांचे चांगलेच मनोरंजन केले.
झाले असे की, कलंदर्सचा डाव चालू असताना टीम अबु धाबीचा गोलंदाज रोहन मुस्तफा आठवे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या षटकातील चौथ्या चेंडूवर आफ्रिदीने गोल फिरून जबरदस्त चौकार मारला.
या शानदार रिव्हर्स शॉटनंतर त्याने गोलंदाज मुस्तफाकडे वळून पाहिले आणि त्याला म्हणाला, “मी याआधी कधीच असाच शॉट खेळला नव्हता. हा माझ्या कारकिर्दीतील पहिला रिव्हर्स शॉट आहे.” आफ्रिदी आणि मुस्तफा यांच्यातील या मजेशीर प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/taimoorze/status/1357708451015782401?s=20
पहिल्या एलिमिनेटर सामन्यात पराभूत झाल्यानंतर कलंदर्स संघाला तिसऱ्या स्थानासाठीचा प्लेऑफ सामना खेळावा लागला. या सामन्यातही त्यांचा सामना टीम अबु धाबी संघाशी झाला. परंतु टीम अबु धाबीने २१ धावांनी हा सामना जिंकला. यामुळे टी१० लीगमध्ये कमीत कमी तिसरे स्थान तरी पटकावण्याचे कलंदर्सचे स्वप्न अधुरे राहिले.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाची सर्वात क्यूट चियरलीडर पाहिली का?, एका तासातच फोटो झालाय भन्नाट व्हायरल
शतक सोडा द्विशतक केलं, तरीही धोनीच्या ‘या’ विक्रमाला धक्काही नाही लावू शकला रुट