पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज कर्णधार शाहिद आफ्रिदी सध्या लिजेंड्स ळीग क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. त्याच्या नेतृत्वातील आशिया लायन्स संघ लीगच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे. अंतिम सामन्यात आशिया लायन्सपुढे वर्ल्ड जायंट्स संघाचे आव्हान आहे. अशातच लायन्स संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ सध्याय सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लिजेंट्ल लीग क्रिकेटमध्ये (Legends League Cricket) इंडिया महाराज, वर्ल्ड जायंट्स आणि आशिया लायन्स हे तीन संघ खेळतात. भारतीय दिग्गजांचा इंडिया लायन्स संघ अंतिम सामन्यात पोहोचू शकला नाही. गौतम गंभीर इंडिया लायन्सचे नेतृत्व करत असून यावेळी तो संघाला अंतिम सामन्यात पोहोचवू शकला नाही. सोमवारी (20 मार्च) वर्ल्ड जायंट्स आणि आशिया लायन्स यांच्यातील अंतिम सामना सुरू होण्याआदी शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आफ्रिदी या व्हिडिओत भारतीय ध्वजावर स्वतःची स्वाक्षरी करताना दिसत आहे.
व्हिडिओत दिसत आहे की, एक चाहता आफ्रिदीकडे स्वाक्षरी करण्यासाठी भारताचा तिरंगा देतो. आफ्रिदी हा तिरंगा अगदी सन्मानपूर्वक हातात घेतो आणि चाहत्याचे मन राखण्यासाठी त्यावर स्वाक्षरी करतो. आफ्रिदीने भारताच्या तिरंग्याप्रती दाखवलेला सन्मान चाहत्यांना चांगलाच भावला आहे. याच कारणास्तव हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Now this is what we call “GRACE” Shahid Afridi signing the Indian flag.
That is how we respect other nations. Little actions like these,bring the world closer and promote love and peace on the planet!Proud of you Lala❤️ #LLCT20 #ShahidAfridi #LegendsLeagueCricket @SAfridiOfficial pic.twitter.com/RVH7CIMxZD— Maham Gillani (@DheetAfridian) March 18, 2023
दरम्यान, यावर्षीच्या लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेचा विचार केला. तर इंडिया महाराज संघाचे प्रदर्शन खूपच सुमार पाहायला मिळाले. इंडिया महाराजने आपल्या चार सामन्यांमध्ये फक्त एक विजय मिळवला. परिणामी संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला नाही. गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर वर्ल्ड जायंट्स आहे. शेन वॉटसनच्या नेतृत्वातील वर्ल्ड जायंट्सने चार पैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावरील आशिया लायन्सने 4 पैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. सोमवारी होणार अंतिम सामन्यानंतर लिजेंड्स लीग 2023 चा विजेता संग समोर येईल.
(Shahid Afridi showered with praise, see what he did with the Indian flag)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ग्रेस’फुल विजयासह युपी वॉरियर्झ WPL एलिमिनेटरमध्ये! आरसीबी-गुजरात स्पर्धेबाहेर
जय भोलेनाथ! विराट-राहुलनंतर उमेश यादवही पोहोचला महाकालेश्वराच्या दरबारी, भल्या पहाटे घेतले दर्शन