---Advertisement---

विश्वविक्रमी कामगिरी!! ऑस्ट्रेलियाला धूळ चारत शकीब अल हसनने टी२० क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरात कोरले नाव

---Advertisement---

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात बांगलादेशने ६० धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह बांगलादेश संघाने ही मालिका ४-१ ने आपल्या नावावर केली आहे. मालिकेतील अंतिम सामन्यात बांगलादेश संघातील अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. यासह त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाकडून मोहम्मद नईमने सर्वाधिक २३ तर, महमदुल्लाहने १९ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर २० षटकांअखेर बांगलादेश संघाला ८ बाद १२२ धावा करण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. ऑस्ट्रेलिया संघाकडून मॅथ्यू वेडने सर्वाधिक २२ धावांची खेळी केली. इतर कुठल्याही खेळाडूंना साजेशी फलंदाजी करता आली नाही. बांगलादेश संघाकडून शकीब अल हसनने ३.४ षटकात अवघ्या ९ धावा खर्च करत ४ गडी बाद केले. यासह त्याने आंतरराष्ट्रीय टी -२० क्रिकेटमध्ये १०० गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.(Shakib al hasan become second most highest wickets takers in T20I)

शकीब अल हसनने हा कारनामा आपल्या ८४ व्या आंतरराष्ट्रीय टी -२० सामन्यात केला. त्याने आतापर्यंत एकूण आंतरराष्ट्रीय टी -२० क्रिकेटमध्ये १०२ गडी बाद केले आहेत. या दरम्यान २० धावा खर्च करून ५ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. यासह त्याने फलंदाजी करताना १७१८ धावा देखील केल्या आहेत.

त्यामुळे तो पहिलाच असा खेळाडू ठरला आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १०० पेक्षा अधिक बळी आणि १००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच त्याने एकूण ३३६ टी -२० सामन्यात ३८१ गडी बाद केले आहेत.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० पेक्षा अधिक गडी बाद करणारा दुसरा गोलंदाज
टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोनच असे गोलंदाज आहेत, ज्यांनी १०० पेक्षा अधिक गडी बाद केले आहेत. श्रीलंका संघाचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने आतापर्यंत एकूण १०७ गडी बाद केले आहेत. तर शकीब अल हसन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ९८ गडी बाद करण्यासह शाहिद आफ्रिदी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आर अश्विनला मिळणार नाही संधी? विराटच्या ‘या’ वक्तव्यामुळे उभे राहिले प्रश्नचिन्ह

‘शार्दुल ठाकूरच गोलंदाजी प्रशिक्षकांना अधिक शिकवत असेल’, दिनेश कार्तिकचे खळबळजनक विधान

बुमराहची विक्रमी कामगिरी! ट्रेंट ब्रिज कसोटीत ९ विकेट्स घेत जहीर, इरफानसारख्या दिग्गजांना टाकले मागे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---