---Advertisement---

बंदीनंतर पुनरागमन करताच शाकिब अल हसनची ‘या’ विक्रमाला गवसणी

On: शनिवार, नोव्हेंबर 28, 2020 11:37 PM
---Advertisement---

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन ‘बंगबंधु टी-२० चषक’ या बांगलादेशातील स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. मागील वर्षी मॅच फिक्सिंगसाठी विचारणा झाल्याची माहिती दडवून ठेवल्याने शाकिबवर आयसीसीने २ वर्षांच्या बंदीची कारवाई केली होती. मात्र, चांगली वर्तणूक ग्राह्य धरून बंदीचा कालावधी कमी करून एका वर्षाचा करण्यात आला होता.

त्याच्या बंदीचा कालावधी हा २९ ऑक्टोबर २०२० ला समाप्त झाल्याने शाकिबने बंगबंधु टी-२० स्पर्धेत जेमकॉन खुलन संघाकडून पुनरागमन केले. या स्पर्धेतील २८ नोव्हेंबर रोजी गाजी ग्रुप चट्टोग्राम या संघाविरुद्ध खेळताना शाकिब अल हसनने एक खास विक्रम आपल्या नावे केला. सर्व प्रकारच्या टी-२० सामन्यांत ५००० धावा आणि ३५० हून अधिक बळी घेणारा तो केवळ दुसरा अष्टपैलू खेळाडू ठरला. शाकिब अल हसनच्या नावावर आता एकूण ५००० धावा आणि ३५५ बळी आहेत.

ड्वेन ब्राव्होच्याही नावे आहे ही कामगिरी

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो सर्व प्रकाराच्या टी-२० सामन्यांत ५००० धावा आणि ५०० बळी घेणारा जगातील पहिला अष्टपैलू खेळाडू आहे. ब्राव्होच्या नावावर ६३३१ धावा आणि ५१२ बळी आहेत. या यादीत तिसर्‍या क्रमांकावर वेस्ट इंडिजचाच दुसरा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल आहे. त्याच्या नावावर ५७२८ धावा आणि ३०० बळी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाला शतकी तडाखा दिलेला फिंच आरसीबी फॅन्सकडून ट्रोल; मीम्स झाले व्हायरल

‘मला आरसीबीसाठी खेळायला मिळेल का?’, इंग्लंडच्या कर्णधाराच्या प्रश्नावर विराटने दिले ‘हे’ उत्तर

फलंदाज म्हणून हार्दिक ऐवजी ‘या’ खेळाडूला मिळाली पाहिजे होती संधी, माजी भारतीय दिग्गजाचे वक्तव्य

ट्रेंडिंग लेख-

वनडेत सर्वाधिक वेळा ३०० हून अधिक धावा करणारे संघ, भारताच्या नावे ‘हा’ विक्रम

आयपीएलमध्ये सुपर फ्लॉप ठरलेले ३ ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताविरुद्ध पहिल्या वनडेत चमकले

भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---