भारताविरुद्ध सुरू असलेल्या चेन्नई कसोटी सामन्यात बांगलादेशचा संघ केवळ 149 धावांवर गारद झाला. बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला भारतीय गोलंदाजांसमोर आपले कौशल्य दाखवता आले नाही. मात्र, संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन त्याच्या एका विचित्र सवयीमुळे नक्कीच प्रसिद्धीझोतात आला. वास्तविक, शाकिब फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा चाहत्यांच्या आणि समालोचकांच्या एक गोष्ट लक्षात आली.
शाकिब फलंदाजी करताना काळा धागा चघळताना दिसला. साधारणपणे कोणताही फलंदाज फलंदाजी करताना असे काही करत नाही. शाकिबचे हे विचित्र कृत्य कॅमेऱ्यांपासून लपून राहू शकले नाही आणि हे पाहताच आता सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे.
समालोचन असलेल्या दिनेश कार्तिक याने शाकिबच्या या अनोख्या सवयीबद्दल सांगितले. कार्तिकच्या म्हणण्यानुसार, ‘बांगलादेशच्या तमिम इक्बालने त्याला सांगितले की, हा धागा शाकिबला त्याच्या फलंदाजीदरम्यान मदत करतो. असे केल्याने शाकिब सतर्क राहतो. तसेच याचे आणखी एक कारण म्हणजे धागा चघळल्यामुळे त्याचे डोके लेग साइडकडे वाकत नाही. याचा अर्थ शाकिब स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी असे करतो.’
शाकिब अल हसन हा जगातील एकमेव असा क्रिकेटर नाही, जो फलंदाजी करताना त्याच्या विचित्र सवयींसाठी ओळखला जातो. भारताच्या वीरेंद्र सेहवागबद्दल असे म्हटले जाते की, तो फलंदाजी करताना गाणी गुणगुणत असे. शा अनेक सवयी आहेत ज्या वेगवेगळ्या क्रिकेटर्सच्या प्रसिद्ध झाल्या आहेत. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशची फलंदाजी अतिशय सामान्य होती. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 376 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ केवळ 149 धावांवरच मर्यादित राहिला.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने तीन बाद 81 धावा बनवल्या होत्या. भारतीय संघाकडे हा सामना तिसऱ्या दिवशी जिंकण्याची मोठी संधी असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN: एकाच दिवशी पडल्या 17 विकेट्स, 1979 नंतर चेपॉकवर पहिल्यांदाच असं घडलं
IND vs BAN: 17 धावांवर बाद होऊनही कोहलीने रचला इतिहास!
‘चुकीच्या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली’, बांगलादेशविरुद्ध फ्लॉप ठरलेल्या रोहितला चाहत्यांचा सल्ला