---Advertisement---

इंग्लिश दिग्गजाचा 20 वर्षांपूर्वीचा विक्रम शाकिबने मोडला, फिरकीच्या जाळ्यात फसला भारताचा अर्धा संघ

On: रविवार, डिसेंबर 4, 2022 5:08 PM
bangladesh Shakib Al hasan
---Advertisement---

बांगलादेश संघाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 186 धावा केल्या आणि सर्वच्या सर्व विकेट्स गमावल्या. भारतीय फलंदाज बांगलादेशच्या गोलंदाजी आक्रमणापुढे एकापाठोपाठ एक विकेट्स गमावत राहिले. त्यांचा माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकी गोलंदाज शाकिब अल हसन याने स्वतःच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद या सामन्यात केली. 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी करणारा डावखुरा गोलंदाज 
शाकिब अल सहन (Shakib Al Hasan) एकदिवसीय मालिकेतील या पहिल्या सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने टाकलेल्या 10 षटकांमध्ये 36 धावा खर्च केल्या आणि 5 विकेट्स नावावर केल्या. भारतीय संघाविरुद्ध खेळलेल्या एकदिवसीय सामन्यात यापूर्वी एकही गोलंदाज शाकिबसारखी कामगिरी करू शकला नव्हता. भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात शाकिब सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारा डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम ऍशले गिल्स (Ashley Giles) यांच्या नावावह होता. गिल्स यांनी भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडसाठी 2002 साली 57 धावा खर्च करून पाच विकेट्स घेतल्या होत्या. आता शाकिबने तब्बल 20 वर्षांनंतर गिल्सचा विक्रम मोडीत काढला आहे.

तसेच शाकिब भारताविरुद्ध एका कसोटी किंवा एकदिवसीय सामन्यात पाच विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी सकलेन मुश्कात, मुथय्या मुरलीधरन, ऍशले गिल्स, अजंथा मेंडिस यांनी भारताविरुद्ध एका कसोटी किंवा एकदिवसीय सामन्यात पाच विकेट्स घेतल्या होत्या. आता या दिग्गजांच्या यादीत शाकिब अल सहन हसभागी झाला आहे.

दरम्यान, उभय संघातील हा सामना रविवारी ढाकाच्या शेर ए बांगला स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारताला आमंत्रित केले. या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली, पण फलंदाज संघाची धावसंख्या अपेक्षेप्रमाणे उचांवू शकलेन नाहीत. भारताचा उपकर्णधार केएल राहुल याने संघासाठी सर्वाधिक 73 धावांची खेळी केली. राहुलव्यतिरिक्त भारताचा एकही फलंदाज असा नव्हता, ज्याने 30 धावांचा टप्पा पार केला असेल. (Shakib Al Hasan made a big record by taking five wickets against India.)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलामीपेक्षा मध्यक्रमात राहुल गोलंदाजांसाठी जास्त घातक! ‘अशी’ आहे आकडेवारी
एटीके मोहन बागानची अपराजित मालिका कायम; बंगळुरू एफसीला घरच्या मैदानावर अपयश 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---