भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यानच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवारी (14 डिसेंबर) सुरुवात होत आहे. चट्टोग्राम येथे हा सामना खेळला जाईल. या सामन्याला 24 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असतानाच, बांगलादेश संघासाठी एक वाईट बातमी समोर येते. बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन याला काही कारणास्तव हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेलेले. त्यामुळे तो पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध असेल की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.
या कसोटी मालिकेच्या पहिल्या कसोटीतून भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा देखील बाहेर झाला आहे. मंगळवारी (13 डिसेंबर) शाकिब व भारतीय संघाचा काळजीवाहू कर्णधार केल राहुल यांनी ट्रॉफीचे अनावरण केले. मात्र, त्यानंतर लगेचच शाकिबला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती समोर आली.
शाकिबने बरगड्या आणि खांद्यांमध्ये वेदना होत असल्याची तक्रार केल्याने त्याला दवाखान्यात नेण्यात आले होते. त्यानंतर काही कालावधीने त्याला ऍम्बुलन्समधूनच सामन्याच्या ठिकाणी सोडले गेले. या प्रकरणावर बोलताना बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांने सांगितले,
”चिंता करण्यासारखी गोष्ट नाही. त्याला वेदना होत असल्याने आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून त्याला दवाखान्यात नेलेले. त्याला आणखी काही त्रास झाल्यास तो नक्की सांगेल. ऍम्बुलन्समधून त्याला इथपर्यंत आणले गेले. कारण, ट्रॅफिक मुळे त्याला बराच वेळ तिथे बसून राहावे लागले असते.”
शाकिबने मैदानावर परतल्यानंतर मात्र सराव सत्रात भाग घेतला नव्हता. त्याची दुखापत किती गंभीर आहे याबाबत देखील अद्याप कोणताही खुलासा केला गेलेला नाही. त्यामुळे तो पहिल्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. तो या सामन्यात सहभागी झाला नाही तर हा बांगलादेश संघासाठी मोठा धक्का असेल.
(Shakib Al Hasan Some Injury Issue Ahead First Test Against India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चिंताजनक! विकेटकीपिंग करताना पाकिस्तानी खेळाडूला दुखापत, डोक्याला चेंडू लागल्यानंतर स्ट्रेचरवरून नेले मैदानाबाहेर
चट्टोग्राममध्ये पूर्ण पाच दिवसांचा खेळ होईल? जाणून घ्या खेळपट्टी, हवामानासह सर्व काही