बांगलादेशचा अनुभवी क्रिकेटपटू शाकिब अल हसन याचा एका स्थानिक सामन्यात गैरवर्तणूक करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. पंचांच्या निर्णयाशी सहमत नसल्याने त्याने रागामध्ये एकाच सामन्यात दोनदा बेशिस्त वर्तन केले. त्याच्या या कृत्याबद्दल अनेकांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केल्यानंतर आता शाकिबने बिनशर्त माफी मागितली आहे. माफीसाठीची एक फेसबुक पोस्ट त्याने शेअर केली.
शाकिबने मागितली माफी
ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर सुरू असलेल्या ढाका प्रीमियर लीगमधील सामन्यात मोहम्मदेन स्पोर्टिंगसाठी खेळताना शाकिबने पंचांचा निर्णय न आवडल्याने सर्वप्रथम स्टम्पला लाथ मारली. त्यानंतर, पुढील षटकात पुन्हा एकदा त्याला राग अनावर झाला व त्याने तीन स्टम्प उखडून खेळपट्टीवर फेकले. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाले आहेत. त्यानंतर, अनेकांनी त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून शाकिबने याप्रकरणी फेसबुक पोस्ट करून माफी मागितली. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले,
“माझ्यासारख्या अनुभवी व आंतरराष्ट्रीय खेळाडूकडून लोक अशी अपेक्षा करत नाहीत. मला माझ्या रागामुळे सामना खराब केल्याचा खेद वाटतो. खासकरून घरून सामना पाहणाऱ्या चाहत्यांसाठी वाईट वाटले. माझ्या या चुकीबद्दल मी संघ प्रशासन व आयोजकांची माफी मागतो. पुन्हा माझ्याकडून असे कृत्य घडणार नाही याची ग्वाही देतो.”
शाकिबवर यापूर्वी आयसीसीने निलंबनाची कारवाई केली होती. तसेच, तो अनेकदा आपल्या राष्ट्रीय क्रिकेट बोर्डाशी पंगा घेताना दिसतो.
#ShakibAlHasan apologises for his on-field behaviour during #DhakaLeague match wherein he was seen kicking the stumps and arguing with umpire after failed appeal.
No apology should spare Shakib from a ban. That was disgraceful. pic.twitter.com/0wCq5iKrRo
— Subhayan Chakraborty (@CricSubhayan) June 11, 2021
बांगलादेशचा सर्वात यशस्वी खेळाडू आहे शाकिब
बांगलादेश क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटू म्हणून शाकिबला ओळखले जाते. २००७ मध्ये पदार्पण करणाऱ्या शाकिबने ५७ कसोटी सामन्यात ३९३० धावा व २१० बळी, २१२ वनडेत ६४५५ धावा आणि २७० बळी मिळवले आहेत. तसेच, त्याने बांगलादेशसाठी ७६ टी२० सामन्यांमध्ये १५६७ धावांसह ९२ गडी बाद केले. तो बराच जगातील पहिल्या क्रमांकाचा अष्टपैलू होता.
महत्त्वाच्या बातम्या –
झिरोच झिरो! कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल इतक्या वेळा शून्यावर बाद झाला ‘हा’ दिग्गज
युवा खेळाडूंचे लाडके द्रविड गुरुजी ‘असे’ करतात त्यांना प्रेरित
श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधारपदी नियुक्त झाल्यावर शिखर धवनने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला…