भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी विश्वचषक 2023 मध्ये आपल्या घातक गोलंदाजीने कहर करत आहे. श्रीलंकन संघाविरुद्धच्या सामन्यात त्याने 5 षटकात केवळ 18 धावा देत 5 विकेट्स घेत भारताला मोठा विजय मिळवून दिला. 5 विकेट्स घेतल्यानंतर मोहम्मद शमीने डोक्याला चेंडू लावत ड्रेसिंग रूमकडे बोट दाखवले.
5 विकेट्स घेतल्यानंतर मोहम्मद शमी (Mohammad Shami) विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. सामना संपल्यानंतर त्याने असे सेलिब्रेशन केले की, ते पाहून सगळेच अवाक् झाले. शमी कोणाकडे बोट दाखवत आहे हे कोणालाच समजले नाही.
5 विकेट घेतल्यानंतर शमीने बॉल डोक्यावर ठेवून ड्रेसिंग रूममकडे इशारा केला होता, परंतु त्याने हे हावभाव कोणासाठी आणि का केले हे कोणालाही समजले नाही. मात्र, सामन्यानंतर सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) याने याचा खुलासा केला आहे.
श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमीने मैदानावर वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन केले. त्याने चेंडू डोक्यावर ठेवला आणि डोक्यावर हात ठेवून ड्रेसिंग रूमच्या दिशेने इशारा केला. दरम्यान, भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलने सांगितले की, “मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांच्यासाठी हा विचित्र प्रकार केला होता”.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला विश्वचषक 2023 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संघात अंतिम 11 चा भाग बनवण्यात आले नव्हते, परंतु हार्दिक पांड्याला दुखापत होताच त्याला अंतिम 11 मध्ये स्थान देण्यात आले आणि संघात जागा मिळताच त्याने आपली क्षमता दाखवली.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने 5 विकेट घेत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. मोहम्मद शमी हा विश्वचषकामध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत 45 विकेट घेतल्या आहेत. याच बरोबर त्याने माजी भारतीय गोलंदाज झहीर खान (44) आणि जवागल श्रीनाथ (44) यांचे विक्रम मोडीत काढले. यासह शमी भारताकडून सर्वाधिक पाच बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने हा पराक्रम चार वेळा केला. तर जवागल आणि हरभजन सिंग यांनी 3-3 वेळा असे केले होते.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने श्रीलंकेला 358 धावांचे लक्ष्य दिले होते. गिल आणि विराटच्या अर्धशतकानंतर श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी करत 56 चेंडूत 82 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. श्रीलंकेचा संघ 19.4 षटकांत 55 धावांत सर्वबाद झाला आणि भारताने 302 धावांनी विजय मिळवला. (Shami takes 5 wickets warns dressing room Gill reveals Said That coach)
म्हत्वाच्या बातम्या
‘मी पूर्णपणे फिट नाही, डेंग्यूमुळे माझे…’, शतक हुकल्यानंतर शुबमनचा धक्कादायक खुलासा
इकडं राहुलची विकेट पडली अन् तिकडं पत्नी अथियाने तोंड लपवलं; रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद, तुम्ही पाहिला का?