---Advertisement---

चाहत्यांचा लाडका शेन..! जेव्हा भारतीय चाहत्यासाठी शेन वॉर्न थेट गर्दीत घुसला होता, पाहा तो व्हिडिओ

---Advertisement---

कोणत्याही खेळात चाहत्यांना विशेष महत्त्व आहे. कारण चाहते मैदानात येऊन खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचे काम करत असतात. क्रिकेटमध्येही चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करत खेळाडू देखील चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत असतात. अनेकदा क्रिकेटपटूंनी चाहत्यांची इच्छा पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात रोमांचक लढत सुरू होती. चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी ३६८ धावांचे लक्ष्य मिळालेले. दरम्यान, भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाला ऑटोग्राफ देताना दिसून आला होता.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक प्रेक्षक कॅमेऱ्यासमोर एक बोर्ड दाखवताना दिसला होता. ज्यावर त्याने शेन वॉर्नकडे ऑटोग्राफची मागणी केली होती. त्यानंतर त्याने आणखी बोर्ड दाखवला, ज्यावर लिहिले होते की,”शेन वॉर्न आम्ही तुमची वाट पाहतोय.” चाहत्याने केलेल्या या मागणीला माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने त्वरित प्रतिसाद दिला होता. काही मिनिटातच शेन वॉर्न प्रेक्षकांजवळ पोहोचला. त्याने त्या चाहत्याला ऑटोग्राफ दिला. यासह त्या चाहत्यासोबत सेल्फी देखील क्लिक केला होता. (Shane warne came in stand to give his autograph to an indian fan in oval)

या रोमांचक सामन्याच्या चौथ्या दिवशी (५ सप्टेंबर) शार्दुल ठाकूर आणि रिषभ पंत यांनी तुफानी खेळी करत अर्धशतक झळकावले होते. शार्दुलने पहिल्या डावात ५७ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात त्याने ६० धावांची खेळी केली होती. तर रिषभ पंत ५० धावा करत माघारी परतला होता. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला सर्वबाद ४६६ धावा करण्यात यश आले होता. यासह भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर विजयासाठी ३६८ धावांचे आव्हान दिले होते.

या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांची संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी चौथ्या दिवसाखेरपर्यंत इंग्लंडला बिनबाद ७७ धावसंख्येपर्यंत पोहचवले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

शेन वॉर्नने १७ वर्षांपूर्वी कसोटीमध्ये केला होता ‘ऐतिहासिक’ पराक्रम, इंग्लंडचा ट्रेस्कोथिक ठरला होता ‘विक्रमी’ बळी

‘या’ भारतीयाच्या विकेटने २९ वर्षांपूर्वी झाली होती शेन वॉर्न पर्वाची सुरुवात…

बिग ब्रेकिंग.! ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याचे निधन, क्रिकेटविश्व हादरले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---