---Advertisement---

‘थँक्यू विराट!’, कर्णधार कोहलीच्या कसोटी प्रेमावर प्रभावित झाला महान ऑसी गोलंदाज

On: बुधवार, सप्टेंबर 8, 2021 2:57 AM
---Advertisement---

लंडन। सोमवारी (६ सप्टेंबर) भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध ओव्हल स्टेडियमवर पार पडलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात १५७ धावांनी विजय मिळवला. याबरोबरच ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या विजयानंतर भारतीय संघाचे खूप कौतुक होत आहे. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्ननेही भारताचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाचे कौतुक केले आहे.

विराटचे कौतुक करताना वॉर्न स्काय स्पोर्ट्समधील कार्यक्रमात म्हणाला की विराट संघातील खेळाडूंना पाठिंबा देतो, ही एका चांगल्या कर्णधाराची ओळख आहे.

वॉर्न म्हणाला, ‘भारतीय संघ विराटकडे पाहातो. त्याला बाकी सर्व खेळाडूंकडू सन्मान मिळतो. खेळाडू विराटची साथ देतात आणि त्याच्यासाठी खेळतात. एक कर्णधार म्हणून ही गोष्ट महत्त्वाची आहे की संघातील खेळाडू तुमच्यासाठी खेळतील.’

खरंतर, ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडसमोर ३६८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने चांगली सुरुवात केली होती. त्यांचे सलामीवीर रॉरी बर्न्स(५०) आणि हसीब हमीद(६३) यांनी अर्धशतके झळकावली होती. तसेच अखेरच्या दिवशी भारतासमोर इंग्लंडच्या १० खेळाडूंना बाद करण्याचे आव्हान होते. त्यातच खेळपट्टी सपाट होती. अशा कठीण परिस्थितीतही विराटने गोलंदाजीत केलेले बदल चांगले होते. ज्यामुळे भारतीय गोलंदाजांनी केवळ २१० धावांत इंग्लंडचा दुसरा डाव गुंडाळला.

याबद्दल वॉन म्हणाला, ‘ज्याप्रकारे त्याने आपल्या संघाचे नेतृत्त्व केले आणि संघाला आत्मविशास दिला, खेळात विश्वास फार महत्त्वाचा आहे. जर तुमच्यात विश्वात नसेल, तर तुमच्याकडे कितीही चांगला संघ असला, तरी तुम्हाला एखादे ध्येय पूर्ण करणे, सोपे जात नाही. विराट कोहली आपल्या संघाला तोच विश्वास देतो.’

त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून कसोटी क्रिकेटच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. पण, या क्रिकेट प्रकाराबद्दल विराटचे असलेले प्रेम पाहून वॉर्नला आनंद झाला आहे. विराटने अनेकदा कसोटी क्रिकेट आवडत असल्याचे सांगितले आहे.

वॉन म्हणाला, ‘मला फक्त इतकेच सांगायचे आहे की ‘विराट, धन्यवाद!’ तो कसोटी क्रिकेटवर प्रेम करतो आणि त्याला प्राधान्य देतो. भारत सध्या क्रिकेट विश्वातील पॉवर हाऊस आहे आणि जगाला क्रिकेटमधील सर्वात मोठा सुपरस्टार सांगतो की कसोटी क्रिकेट खूप महत्त्वाचे आहे. आम्ही ऑस्ट्रेलियात जाऊन जिंकत आहोत आणि आम्ही इंग्लंडमध्ये जिंकत आहोत. याचा अर्थ असा की आम्ही भारतात, जिथे चेंडू फिरकी घेतो, तिथे जिंकतो. आम्ही ऑस्ट्रेलियाच्या वेगवान आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर खेळून जिंकतो आणि आम्ही इंग्लंडमध्ये सीम-स्विंग होणाऱ्या खेळपट्ट्यांवरही खेळून जिंकतो. आम्ही हे सर्व या संघाबरोबर खेळताना मिळवतो.’

https://twitter.com/j_dhillon7/status/1434916498812801025

इंग्लंड विरुद्ध भारत संघातील ५ वा आणि अखेरचा सामना मँचेस्टरमध्ये १० सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. हा सामना निर्णायक सामना आहे. कारण अखेरचा सामना जिंकून किंवा अनिर्णित राखून मालिका जिंकण्याची संधी भारताकडे असणार आहे. तर इंग्लंडला मालिकेतील पराभव टाळायचा असेल तर अखेरचा सामना जिंकण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

ओव्हलच्या ऐतिहासिक विजयावर गांगुलीने दिली अशी प्रतिक्रिया की माजी इंग्लिंग कर्णधाराला लागली मिर्ची

विराटच्या ‘तुतारी सेलिब्रेशन’वर बार्मी आर्मीची खिलाडूवृत्ती; म्हणाले, ‘बरोबरीचा खेळ राहिला, आता…’

पाचव्या कसोटी सामन्यासाठी जार्वोने केलीय अशी तयारी, म्हणतोय…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---