ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू शेन वॉटसनने टी२० क्रिकेटमधील टॉप ५ फलंदाजांची निवड केली आहे. या यादीत त्याने वेस्ट इंडिज संघातील सर्वाधिक खेळाडूंना स्थान दिले आहे. शेन वॉटसनने निवडलेल्या या यादीत त्याने वेस्ट इंडिजच्या २ खेळाडूंची निवड केली आहे, तर भारतीय संघातील केवळ एका खेळाडूला स्थान देण्यात आले आहे.
१. ख्रिस गेल (युनिव्हर्स बॉस)
या यादीत शेन वॉटसनने वेस्ट इंडिजचा स्फोटक सलामीवीर ख्रिस गेलला पहिल्या स्थानावर ठेवले आहे. त्यामागचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले की, “टी२० क्रिकेटमध्ये या दिग्गजाने काय केले असेल याची कल्पना करणे कठीण आहे. १३००० पेक्षा जास्त टी२० धावा, २२ पेक्षा जास्त शतके, जवळपास १००० षटकार, केवळ आश्चर्यकारक.”
२. एबी डिव्हिलियर्स
या यादीत वॉटसनने पुढे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सला दुसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे. ते म्हणाले की, “तो अंतिम फलंदाज आहे. तो चेंडू हवे तिथे मारू शकतो. एबी डिव्हिलियर्स फक्त टी-२० मध्येच नाही तर क्रिकेटच्या प्रत्येक स्वरुपात महान आहे.”
३. विराट कोहली
या यादीत शेन वॉटसनने भारतीय कर्णधार विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे. याचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले की, “विराट हा अंतिम फिनिशर आहे. त्याने कुठेही फलंदाजी करावी, कोणत्याही परिस्थितीत फलंदाजी करावी, तो नेहमीच चांगली कामगिरी करत आला आहे. तो जेव्हा पाहिजे तेव्हा चेंडू मारू शकतो.”
४. आंद्रे रसेल
या यादीत पुढचे नाव वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलचे आहे. ते म्हणाले की, “रसेल हा टी२० चा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. टी२० मध्ये त्याने १७० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. तो डावाच्या शेवटी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतो.”
५. डेव्हिड वॉर्नर
या यादीत शेवटचे नाव ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे आहे. वॉर्नरला स्थान देताना तो म्हणाला, “वॉर्नरची वेगवान आणि फिरकी गोलंदाजीला खेळण्याची क्षमता त्याला इतरांपासून वेगळे करते. त्याची टी२० क्रिकेटमधील सरासरी आणि स्ट्राइक रेट आश्चर्यकारक आहे.”
महत्वाच्या बातम्या-
‘या’ प्रकरणी वॉनविरुद्ध बीबीसीची कठोर कारवाई, पण इंग्लंडच्या माजी कर्णधाराने आरोपांना म्हटले निराधार
पंजाब किंग्ज संघाची साथ सोडून केएल राहुल आयपीएल २०२२ मध्ये ‘या’ संघात करणार प्रवेश?