शेन वॉटसन ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या दिग्गजांपैकी एक आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन काही वर्षांचा काळ लोटला आहे. सध्या वॉटसन समालोचक आणि प्रशिक्षक म्हणून वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये जबाबदारी पार पाडत आहे. त्याला पाकिस्तान क्रिकेटकडून एक महत्वाची जबाबदारी स्वीकारण्याचा प्रस्ताव आला होता. पण ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हा प्रस्ताव नाकारला आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार शेन वॉटसर (Shane Watson) याने ऑस्ट्रेलिया संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याचा प्रस्ताव नाकारला आहे. सध्या त्याला केवळ टी-20 लीगमध्येच प्रशिक्षक म्हणून काम करायचे आहे. सोबतच तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये समालोचकाच्या भूमिकेत देखील दिसतो. याच कारणास्तव त्याने पाकिस्तान क्रिकेटला आपला नकार कळवला आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जागा सध्या खाली आहे. काही दिवसांपूर्वी मोहम्मद हाफीज याच्याकडे संघ संचालक आणि मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली गेली होती. पण संघ सतत पराभूत होत असल्याने मोहम्मद हाफीजने आपल्या पदांचा राजीनामा दिला. त्यानंतरच पाकिस्तान क्रिकेट मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. शेन वॉटसन यालाही पीसीबीकडून या पदाचा प्रस्ताव दिला गेला होता, जो सध्या पाकिस्तान सुवर लीगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्ससाठी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहे. माहितीनुसार पीसीबीकडून या जबाबदारीसाठी वॉटसनला 2 मिलियन यूएस डॉलर्सचा प्रस्ताव मिळाला होता.
इएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार शेन वॉटसन पाकिस्तनचा मुख्य प्रशिक्षक बनणार नाहीये. कारण त्याने स्वतःला या स्पर्धेतून बाहेर करून घेतले. वॉटसन आयपीएलमध्ये समालोचकाची भूमिका पार पाडतो आणि मेजल लीग क्रिकेटमध्ये सॅन फ्रांसिस्कोचा प्रशिक्षक आहे. पीएसएलमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्याचे कुटुंब सिडनीमध्ये राहतो. याच कारणास्तव त्याला सध्या तरी कोणत्याच संघाचा पूर्णवेळ प्रशिक्षक बनायचे नाहीये.
दरम्यान, वॉटसनच्या मार्गदर्शनात क्वेटा ग्लॅडिएटर्स संघ पीएसएल 2024च्या प्लेऑफ्समध्ये पोहोचला. पण एलिमिनेटर सामन्यात त्यांना पराभव मिळाला आणि संघ लीगमधून बाहेर पडला. पीएसएल संपल्यानंतर पाकिस्तान संघाला काही महत्वाच्या मालिका खेळायच्या आहेत. न्यूझीलंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहे. आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका संघासाठी महत्वाची आहे. याच मालिकेसाठी पीसीबी नवीन प्रशिक्षकाच्या शोधात होते. पण आता पाकिस्तान संघाला ही मालिका मुख्य प्रशिक्षक नसतानाच खेळावी लागू शकते. (Shane Watson’s rejection for the post of Pakistan’s head coach, came to the fore)
महत्वाच्या बातम्या –
पुरुष संघाशी तुलना नको! WPL फायनलआधी ‘हे’ काय बोलून गेली आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना
आयर्लंडच्या फलंदाजाचा टी20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम, ‘असं’ करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू