भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना शुक्रवारपासून (३ डिसेंबर) सुरू झाला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. तब्बल पाच वर्षांनंतर वानखेडे स्टेडियमवर कसोटी सामन्याची पर्वणी चाहत्यांना पाहायला मिळतेय. सामन्याच्या पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सामन्याचा आस्वाद घेतला. रूपाली चाकणकर यांनी याबाबतची केलेली फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे.
शरद पवारांनी लुटला सामन्याचा आनंद
तब्बल पाच वर्षांनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वानखेडे स्टेडियमवर कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याला एमसीएचे माजी अध्यक्ष तसेच बीसीसीआय व आयसीसीचे अध्यक्षपद भूषवलेल्या शरद पवार यांनी हजेरी लावली. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यादेखील उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये हे दोन प्रमुख अतिथी सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. रुपाली चाकणकर यांनी केलेल्या पोस्टमध्ये लिहिले,
‘आज आदरणीय साहेबांसोबत वानखेडे स्टेडियम येथे जाण्याचा योग आला. आयुष्यातील स्वप्नांपैकी एक सोनेरी स्वप्न आज पूर्ण झाले.
आदरणीय साहेबांनी क्रीडा क्षेत्रात केलेलं कार्य उत्तुंग आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय, आयसीसी या संघटनांच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटला यशाच्या शिखरावर नेण्याचं काम आदरणीय साहेबांनी केले आहे. आदरणीय साहेबांच्या उपस्थित या मैदानावर झालेले क्रिकेटचे सामने लहानपणापासून फक्त टि व्हीवर पाहत आले,आज प्रत्यक्ष या माझ्या दैवतासोबत उपस्थित राहून पाहण्याचा योग आला.धन्यवाद साहेब. अनेक देशांचे संघ भारतात खेळण्यासाठी उत्सुक असतात. सध्या न्यूझीलंड क्रिकेट संघ आणि भारतीय क्रिकेट संघ यांच्यात वानखेडे स्टेडियम येथे कसोटी सामना सुरू आहे.’
https://www.facebook.com/177300259309608/posts/1531100373929583/?d=n
कोण आहेत रूपाली चाकणकर
रूपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या म्हणून सर्वश्रुत आहेत. त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचे अध्यक्षपदौ तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद आहे. तसेच त्या सामाजिक कार्यात देखील नेहमीच अग्रेसर असतात.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२ लिलावापूर्वी अहमदाबाद आणि लखनऊ संघ ‘या’ ३ खेळाडूंवर खर्च करु शकतात कोट्यावधी रुपये
कोण असेल राजस्थान रॉयल्सचा पुढील कर्णधार? कुमार संगकाराने केला खुलासा