आयपीएल 2023चा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जने 7 धावांनी विजय मिळवला. पंजाबच्या विजयात युवा गेवान गोलंदाज अर्शदीप सिंग याचे योगदान सर्वात महत्वाचे राहिले. त्याने घेतलेल्या तीन विकेट्साठी अर्शदीपला सामनावीर म्हणून नियुक्त केले गेले. पण दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर याने मात्र नकोसा विक्रम केला.
पंजाब किंग्जने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्सच्या नुकसानावर 191 धावा केल्या. केकेआरसाठी त्यांचा वेगवान गोलेंदाज शार्दुल ठाकरू महागात पडला. शार्दुलने 4 षटकांमध्ये 43 धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. दरम्यान, आयपीएलमध्ये ही 17 वी वेळ आहे, जेव्हा शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याने आप्लया चार षटकांच्या कोट्यात 40 पेक्षा अधिक धावा खर्च केल्या आहेत.
आयपीएलमध्ये चार षटकांच्या कोट्यात सर्वाधिक वेळा 40 पेक्षा अधिक धावा खर्च करणाऱ्यांमध्ये मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांची नावे संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहे. या दोघांनीही प्रत्येकी 19-19 वेळा आपल्या कोट्यामध्ये 40 पेक्षा जास्त धावा खर्च केल्या आहेत. वेस्ट इंडीजचा दिग्गज ड्वेन ब्रावो याने आयपीएलमध्ये 18 वेळा 40 पेक्षा अधिक धावा खर्च केल्या आहेत. तसेच या यादीत पाचव्या क्रमांकावर ट्रेंट बोल्ट आहे. बोल्टने आयपीएलमध्ये 17 वेळा 40 पेक्षा जास्त धावा विरोधी संघाला दिल्या आहेत. उमेश यादव, मोहम्मद शमी, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर आणि ट्रेंट बोल्ड अशी ही यादी आहे.
दरम्यान उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, केकेआरने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या पंजाबने 20 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या नुकसानावर 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरच्या डावात पावसाने व्यत्यय आणला. परिणामी पंचांना हा सामना 16 षटकांचा करावा लागला आणि आणि विजयासाठी केकेआरला 154 धावांचे लक्ष्य मिळाले. केकेआरचे खेळाडू मात्र हे लक्ष्य निर्धारित 16 षटकांमध्ये काठू शकले नाहीत. 16 षटकात 7 बाद 146 धावांपर्यंत केकेआर संघ मजल मारू शकला. (Shardul Thakur’s name is also among the highest run spenders in IPL, see the complete list)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मार्क इधर है! पाच वर्षानंतर आयपीएल खेळायला उतरलेल्या ‘वेगवान’ वूडने मोडला 11 वर्षांपूर्वीचा विक्रम
BREAKING । दिग्गज भारतीय अष्टपैलू काळाच्या पडद्याआड, जानेवारीत झालेली मोठी शस्त्रक्रिया