इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा सुरु असताना मे महिन्याच्या सुरुवातीला काही खेळाडूंना आणि संघांमधील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. परंतु, बीसीसीआयच्या अथक प्रयत्नांमुळे या स्पर्धेतील उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान युएईमध्ये खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा येत्या १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. याची घोषणा होताच शारजाह क्रिकेट स्टेडीयमच्या अधिकाऱ्यांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.
या स्पर्धेतील ३१ सामने अजूनही शिल्लक आहेत. यापैकी १० सामने हे शारजहाच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहेत. तसेच शारजहा क्रिकेट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) खलफ बुकातीर यांनी आपल्या म्हटले की,”आम्ही सुरक्षित वातावरणात आयपीएल स्पर्धेचे आयोजन व्हावे याच प्रयत्नात आहोत. तसेच आम्ही ही स्पर्धा सुरू होण्याची आतुरतेने वाट देखील पाहत आहोत.”(Sharjah stadium is ready to host remaining matches of ipl 2021)
तसेच ते पुढे म्हणाले की,”आम्ही आमच्या सुविधांमध्ये आणखी भर टाकण्याच्या प्रयत्नात आहोत. तसेच आमची खेळपट्टी ही आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाकरिता अगदी योग्य आहे. पुन्हा एकदा या विश्वप्रसिद्ध स्पर्धेचे यजमानपद मिळवणे ही आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे.”
साल २०२० मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत शारजहा स्टेडियमवर सर्वाधिक धावा कुटल्या गेल्या होत्या. तसेच याच स्टेडियमवर सर्वात जास्त धावांचा पाठलाग देखील यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला होता. आयपीएल २०२० स्पर्धेत राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने २२३ धावा केल्या होत्या.
तसेच यावर्षी शारजहाच्या मैदानावर पहिला सामना २३ सप्टेंबर रोजी पाच वेळेस आयपीएल स्पर्धेचे चॅम्पियन मुंबई इंडियन्स विरुद्ध आपल्या पहिल्याच जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध होणार आहे. यासह या मैदानावर २ प्लेऑफचे सामने देखील खेळवण्यात येणार आहेत. ११ ऑक्टोबर रोजी या मैदानावर एलिमिनेटरचा सामना खेळला जाईल तर, १३ ऑक्टोबर रोजी क्वालिफायर २ चा सामना खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –