---Advertisement---

…म्हणून प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या डोळ्यात आले पाणी 

On: बुधवार, जानेवारी 20, 2021 2:25 PM
---Advertisement---

भारतीय संघाने मंगळवारी(19 जानेवारी) ऑस्ट्रेलियातील गाबा या मैदानावर 3 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाने भारतीय संघाने संघाने दोन विक्रम रचले. भारतीय संघाने या विजयाबरोबर बॉर्डर गावसकर चार सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. त्याचबरोबर भारतीय संघाने 32 वर्षांनी प्रथमचं गाबा येथे विजय मिळवला. त्यामुळे सर्व खेळाडू या ऐतिहासिक विजयाने भावूक झाले होते. त्याचबरोबर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांना सुद्धा या विजयाने अश्रू अनावर झाले.

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी जेव्हा पासून भारतीय संघाची जबाबदारी स्विकारली. तेव्हा पासून भारतीय संघाने आपली कामगिरी उंचावली. भारतीय संघाने रवि शास्त्री यांच्या प्रशिक्षणाखाली दुसर्‍यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजय मिळवला आहे. या अगोदर भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2018-19 साली पहिला मालिका विजय मिळवला होता. त्यांनंतर आता अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली दुसरा मालिका विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर कधीच भावूक न होणारे रवि शास्त्री सुद्धा भावूक झाले.

रवि शास्त्री म्हणाले, “मी भावूक झालो. सर्वसाधारणपणे माझ्या डोळ्यात अश्रू येत नाहीत. मात्र, मी सुद्धा भावूक झालो. माझ्या डोळ्यात अश्रू आले, कारण हे अवास्तविक होते. या खेळाडूंनी जे केले, ते इतिहासात सर्वात शानदार विजयापैकी एक म्हणून नोंद केली जाईल. कोरोनाचा काळ, खेळाडूंच्या दुखापती आणि 36 धावांवर सर्वबाद झाल्यानंतर असे प्रदर्शन अफलातून होते. ”

खेळाडू इतक्या चर्चेत राहिल्यानंतर देखील त्यांना असे वाटते का की त्यांना श्रेय मिळाले नाही, हे विचारल्यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री म्हणाले,” प्रशिक्षकाचे काम असते की, खेळाडूंना मानसिकरीत्या तयार करणे. त्यांची मानसिकता सरळ ठेवणे. खेळ सरळ ठेवला की खूप कामं सोपी होतात.”

त्यांनंतर रवि शास्त्री म्हणाले, “प्रशिक्षकाला काय हवे, तो तर ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असतो. खेळाडू बाहेर जाऊन लढतात. त्यामुळे कोणत्या स्टेटमेंटची गरजच नाही. क्रिकेट बोलेल.”

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्याची बॉर्डर-गावसकर मालिका खेळली गेली. या मालिकेतील पहिला सामना ऍडलेड येथे खेळला गेला. ज्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारतावर 8 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यांनंतर मेलबर्न येथे झालेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय संघाने देखील दमदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलिया संघावर 8 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर तिसरा सामना सिडनीत खेळला गेला. जो सामना अनिर्णित राहिला. त्यांनंतर चौथ्या कसोटी सामना भारतीय संघाने 3 विकेट्सने जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला. त्याचबरोबर मालिका सुद्धा जिंकली.

महत्त्वाच्या बातम्या –

…अन् ऑस्ट्रेलियन कोच लँगर भारतीयांबद्दल असे काही बोलले, की व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

टीम इंडियाच्या विजयाने गुगल बाबाही खुश! ऑनलाईन फटाके फोडत क्रिकेटप्रेमींना मोठं सरप्राईज

वंदे मातरम! ब्रिस्बेन कसोटी विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ फॅनचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---