भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानची बहुप्रतिक्षित कसोटी मालिका ४ ऑगस्टपासून नॉटिंघम येथे सुरू होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेत जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष भारतीय कर्णधार विराट कोहली याच्यावर असेल. कारण जगातील सर्वोत्तम फलंदाज असलेला विराट जवळपास दोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय शतक झळकावू शकला नाही.
विराटच्या शतकाची प्रतीक्षा लांबत चालली असली तरी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा एक खेळाडू होऊन गेला आहे ज्याला आपले पहिले वनडे शतक ठोकण्यासाठी १८९ सामने वाट पहावी लागली होती. हा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार व दिग्गज अष्टपैलू शॉन पोलॉक होय. आज (१६ जुलै) पोलॉक वयाच्या ४९ व्या वर्षात पदार्पण करत आहे.
शानदार राहिले होते पदार्पण
शॉन पोलॉक हा दक्षिण आफ्रिका क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो. अत्यंत युवा वयात देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर इंग्लंड विरुद्ध केपटाऊन येथे त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करताना त्याने प्रथम ६६ धावांची लाजवाब खेळी केली आणि त्यानंतर ४ बळी मिळवत संघाच्या विजयात योगदान दिले.
खेळाडू म्हणून पोलॉकची कारकीर्द दैदिप्यमान असली तरी कर्णधार म्हणून तो प्रभावी ठरला नाही. त्याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने २००३ मध्ये मायदेशात झालेला वनडे विश्वचषक खेळला. मात्र, या विश्वचषकातून दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच फेरीत बाहेर पडावे लागले. २००७ विश्वचषकात देखील त्याने संघाचे प्रतिनिधित्व केले. या विश्वचषकात उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर, पुढील वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्या हंगामात त्याने काही सामन्यात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व देखील केले. यावेळी देखील तो संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचविण्यात अपयशी ठरला.
अशी राहिली कारकीर्द
शॉन पोलॉकने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम रचले. नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत सर्वाधिक शतके काढण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे. तो सलग १८९ वनडे सामने शतक ठोकून शकला नव्हता. तसेच, वनडेमध्ये ९९ धावांवर नाबाद राहणारा तो पहिला कर्णधार ठरला. आपल्या १०८ सामन्यांच्या कसोटी कारकिर्दीत त्याने ३७८१ धावा व ४२१ बळी मिळवले. पोलॉकच्या ३०३ सामन्यांच्या वनडे कारकिर्दीत तो ३५१९ धावा ३९३ बळी घेण्यात यशस्वी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, ‘या’ २४ खेळाडूंचा मिळाली संधी
‘हार्दिक भविष्यात धोनीसारखा खतरनाक फिनिशर बनेल’; पाहा कोणी व्यक्त केलाय विश्वास
मुरलीधरनचा लेक मैदान गाजवण्यासाठी होतोय सज्ज, त्याच्या गोलंदाजीत तुम्हालाही दिसेल बापाची छबी