मंगळवारी(१० नोव्हेंबर) न्यू साउथ वेल्स आणि टास्मानिया यांच्यातील शेफील्ड शील्ड सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क प्रथम श्रेणी सामन्यात शतकाला मुकला. तिसर्या डावातील शेवटच्या सत्रात न्यू साउथ वेल्सचा कर्णधार पीटर नेव्हिलने 6 बाद 522 अशी मोठी धावसंख्या झाल्याने डावाची घोषणा केली. तेव्हा खेळाच्या तिसर्या डावात फलंदाजी करणारा स्टार्क नाबाद 86 धावांवर खेळत होता.
सीन एबॉटने आपले शतक पूर्ण केल्यानंतर लगेचच ही घोषणा करण्यात आली. खेळ संपण्यासाठी आणखीन एक तास शिल्लक होता. अशात स्टार्क सहजपणे आणखी 14 धावा करू शकला असता. पण नेव्हिलने डाव घोषित करून फलंदाजीतील जोडीला तंबूत परत बोलावले.
डाव घोषित करण्याच्या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज चांगलाच नाराज झाला. संघाच्या तंबूजवळ जाताच त्याने आपली बॅट रागाने जमिनीवर फेकून दिली. त्याच्या या कृतीचा क्षण कॅमेर्यात कैद झाला व तो क्रिकेट.कॉम.ऑसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला गेला
स्टार्क 104 वा प्रथम-श्रेणी सामना खेळत होता ज्यात त्याचे शतक हुकले. या आधी तो प्रथम-श्रेणी सामन्यात 99 धावांवर बाद झाला होता. तर 2013 साली त्याने भारता विरुद्ध 99 धावा केल्या होत्या. 86 धावांवर खेळताना त्याला शतकाची आस होती. हे शतक त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील पहिले शतक असणार होते. परंतु ते हुकल्याने त्याला संताप अनावर झाला.
Peter Nevill declared while Mitch Starc was on 86*…
The quick wasn't too happy! #SheffieldShield pic.twitter.com/NQLTkh1L0w
— cricket.com.au (@cricketcomau) November 10, 2020
न्यू साउथ वेल्स आणि टास्मानिया यांच्यातील शेफील्ड शील्ड सामन्याबद्दल, निक लार्किन आणि मॉईस हेनरिक्स यांनीही दुसर्या डावात शतके झळकावली. न्यू साउथ वेल्सने 522-6 घोषित करून टास्मानियापुढे 348 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र टास्मानियाच्या संघाने सर्वबाद 202 धावा केल्या. न्यू साउथ वेल्सने हा सामना 145 धावांनी जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘विराट ऐवजी रोहित असायला हवा भारताचा कर्णधार’, पाहा कोण म्हणतयं
एकच फाईट !! ‘हा’ पट्ट्या ठरला आयपीएलच्या अंतिम सामन्यात ‘मॅचविनर प्लेअर’
…आणि रोहितने दोन मिनिटात केली सुनील गावसकरांची बोलती बंद