कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (२५ जुलै) ३ टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतासाठी सलामीवीर पृथ्वी शॉ व फिरकीपटू वरूण चक्रवर्ती यांनी पदार्पण केले. शिखर धवन या सामन्यात प्रथमच संघाचा कर्णधार म्हणून काम पाहत आहे. मात्र, याबरोबरच तो भारताचा सर्वात वयस्कर टी२० कर्णधार बनला.
धवन बनला सर्वात वयस्कर टी२० कर्णधार
शिखर पहिल्या सामन्यात कर्णधार म्हणून उतरल्यानंतर भारताचा सर्वात वयस्कर टी२० कर्णधार बनला. शिखरने ३५ वर्ष व २३२ दिवस इतके वय असताना कर्णधारपदाचे पदार्पण केले. यापूर्वी आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये कर्णधार म्हणून पहिला सामना खेळताना सर्वाधिक वय असण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावे होता. त्याने तीस वर्षे आणि २३४ दिवस इतके वय असताना २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध प्रथम भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
एकूण वयाचा विचार केल्यास भारताचा सर्वात वयस्कर टी२० कर्णधार होण्याचा मान एमएस धोनीच्या नावावर होता. धोनीने ३५ वर्ष ५२ दिवस इतके वय असताना अखेरच्या वेळी टी२० सामन्यात भारताचे नेतृत्व केलेले.
भारताकडून वनडे सामन्यात सर्वाधिक वय असताना नेतृत्व करण्याचा विक्रम देखील शिखराच्या नावे जमा आहे. त्याने याच श्रीलंका दौऱ्यावरील वनडे मालिकेत ३५ वर्ष व २२५ दिवस इतके वय असताना भारताचे नेतृत्व केले होते.
भारताची सन्मानजनक धावसंख्या
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकात १६४ धावा बनविल्या. कर्णधार शिखर धवन व संजू सॅमसन यांनी अनुक्रमे ४६ व २७ धावा ठोकल्या. चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या सूर्यकुमार यादवने दमदार अर्धशतक साजरे केले. इशान किशन याने अखेरच्या काही षटकांत मोठे फटके खेळून भारताला सन्मानजनक मजल मारून दिली. वेगवान गोलंदाज दुष्मंता चमिरा आणि वनिंदू हसरंगाने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या –
कमनशिबी शॉ! पृथ्वी ठरला पदार्पणात ‘गोल्डन डक’ होणारा दुसरा भारतीय