बेंगलोर | गुरुवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामन्यात शिखर धवनने ८७ चेंडूत शतकी खेळी केली. याबरोबर त्याने एक खास विक्रम केला.
कसोटीच्या पहिल्याच दिवशी लंचपुर्वी शतकी खेळी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये केवळ ६ फलंदाजांनी असा कारनामा केला आहे.
१९७६ नंतर केवळ २ खेळाडूंना असा कारनामा करता आला आहे. त्यात डेविड वार्नरने २०१७मध्ये पाकिस्तानविरुद्ध तर आज शिखर धवनने हा पराक्रम केला आहे.
यापुर्वी पहिल्या दिवशी लंचपुर्वी भारतीय फलंदाजांमध्ये केवळ विरेंद्र सेहवागने ९९ धावा केल्या होत्या. त्याने २००६मध्ये सेंट लुसियामध्ये विंडीजविरुद्ध खेळताना ह्या सर्वोच्च धावा केल्या होत्या.
लंचपुर्वी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शिखर तिसऱ्या स्थानी आहे. नाबाद ११२ धावा करणारे मॅकर्टेन या यादीत पहिल्या तर १०८ धावा करणारे माजीद खान हे या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत.
एकाच सत्रात तीन वेळा शतकी खेळी करणारा शिखर धवन हा केवळ चौथा खेळाडू आहे. डाॅन ब्रॅडमन (६) , ट्रंपर (३) आणि हॅमंड (३) हे अन्य खेळाडू आहेत ज्यांनी एकाच सत्रात तीन पेक्षा अधिक वेळा शतकी खेळी केली आहे.
कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी लंचपुर्वी शतकी खेळी करणारे खेळाडू
१९०२- ट्रंपर वि इंग्लंड
१९२१- मॅकर्टेन वि इंग्लंड
१९३०- ब्रॅडमन वि इंग्लंड
१९७६- माजीद खान वि न्युझीलंड
२०१७- डेविड वार्नर वि पाकिस्तान
२०१८- शिखर धवन वि अफगाणिस्तान#म #मराठी @MarathiBrain @Mazi_Marathi @kridajagat— Sharad Bodage (@SharadBodage) June 14, 2018