कोरोना व्हायरसपासून आता थोडी विश्रांती मिळाली नव्हती तोच भारतातील काही राज्यांत बर्ड फ्लू या आजाराने थैमान घातले आहे. देशभरात झपाट्याने हा आजार पसरत असल्याने विविध राज्यांत अलर्ट जारी करण्यात आले आहेत. अशात भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज शिखर धवन याने वारासणी येथे फिरायला गेले असताना बर्ड फ्लूच्या गाइलाइन्सचे उल्लंघन केले आहे.
वारासणीतील गंगा नदीमध्ये होडीने फिरण्याचा आनंद लुटताना त्याने जवळपासच्या पक्ष्यांना दाणे खाऊ घातले. यावेळचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर तेथील प्रशासनाने होडीचे मालक प्रदीप साहनी आणि सोनी साहनी यांच्यावर कारवाई केली आहे. तसेच त्यांना पुढील आदेश येईपर्यंत गंगा नदीमध्ये होडी चालवण्यावर बंदी घातली आहे.
पक्ष्यांना दाणे खाऊ घालण्यावर प्रतिबंध
गेल्या काही महिन्यांपासून देशभरात बर्ड फ्लू या आजाराचे सावट पसरले आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणासहित बरेच राज्य या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील तीर्थक्षेत्र वारासणी येथील प्रसिद्ध वारासणी घाटवर पक्ष्यांना दाणे खाऊ घालण्यास प्रतिबंध लावण्यात आले आहेत. तरीही नावाड्यांनी धवनला पक्ष्यांना दाणे खाऊ घालण्यापासून न थांबवल्याने त्यांना शिक्षा देण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/CKVzFwFASot/?utm_source=ig_web_button_share_sheet
शिखर धवनची क्रिकेट कारकिर्द
शिखर धवनच्या क्रिकेट कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर, आतापर्यंत धवनने १३९ वनडे सामने खेळले आहेत. दरम्यान १७ शतकांसह त्याने ५८०८ धावा केल्या आहेत. तसेच ६३ टी२० सामन्यात १६६९ धावांची कामगिरी केली आहे. याबरोबरच कसोटी क्रिकेटमध्ये ३४ सामने खेळत ७ शतकांच्या मदतीने २३१५ धावा केल्या आहेत.
आयपीएल २०२०मध्येही दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना धवनने अप्रतिम कामगिरी केली होती. पूर्ण हंगामात १७ सामने खेळत २ शतकांच्या मदतीने त्याने ६१८ धावा केल्या होत्या. त्याच्या पूर्ण आयपीएल आकडेवारीला पाहिले तर, १७६ सामन्यात त्याने ५१९७ धावांची कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ती’ घटना घडली अन् बाऊंसरची भीती पळाली, शुबमन गिलने केला खुलासा
“कर्णधार कोणीही असो, आमची इच्छा एकच..”, विराटच्या नेतृत्त्वाशी तुलना केल्याने रहाणेचे मोठे भाष्य
पंत आणि साहामध्ये यष्टीरक्षणासाठी टक्कर? वृद्धिमान साहा म्हणतो, “शेवटचा निर्णय संघ…”