वेस्ट इंडिजविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० ने आघाडीवर असलेला भारतीय संघ सलग दुसरा सामना जिंकत वनडे मालिका खिशात घालण्याच्या तयारीत असेल. या सामन्यात भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार शिखर धवन याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. मागील सामन्यात धवनचे शतक केवळ ३ धावांनी हुकले होते. यानंतर आता दुसऱ्या सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी केल्यास तो नवा विक्रम करू शकतो.
धवन (Shikhar Dhawan) वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे क्रिकेटमधील आपल्या १००० धावा (One Thousand ODI Runs) पूर्ण करणारा फलंदाज बनू शकतो. यासाठी त्याला दुसऱ्या सामन्यात ५९ धावा कराव्या लागतील. सध्या २९ डावांमध्ये त्याच्या खात्यात ९४१ धावांची नोंद आहे. त्याने ३४.८५ च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. तसेच वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २ शतके आणि ६ अर्धशतके आहेत.
जर धवनने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान ५९ किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या तर तो एकहजारी मनसबदार बनेल. यासह तो युवराज सिंग (९७८ धावा) आणि मोहम्मद अझिरुद्दीन (९९८ धावा) यांनाही मागे टाकेल. वेस्ट इंडिजविरुद्ध १००० वनडे धावा करणारा तो सहावा भारतीय असेल. त्याच्यापूर्वी विराट कोहली, रोहित शर्मा, सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, एमएस धोनी यांनीही वेस्ट इंडिजविरुद्ध १००० धावांचा आकडा ओलांडला आहे. जर धवनने त्याच्या १००० धावा पूर्ण केल्या तर, तो हा पराक्रम करणारा तिसरा सक्रिय फलंदाजही बनेल.
अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन-
भारत: शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन/इशान किशन (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, अक्षर पटेल/अर्शदीप सिंग, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल.
वेस्ट इंडिज: शाय होप (यष्टीरक्षक), कायले मेयर्स, शामराह ब्रूक्स, निकोलस पूरन (कर्णधार), ब्रेंडन किंग, रोवमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, गुडाकेश मोती, जॅडन सील्स, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजला मायदेशात धूळ चारण्यासाठी धवन लढवणार शक्कल, प्लेइंग Xiमध्ये करणार ‘हा’ बदल
मॅच विनिंग प्रदर्शनानंतर सिराजने सांगितला त्याचा शेवटच्या षटकातील प्लॅन, असा वाचवला सामना
क्रिकेटर मोहम्मद शमीच्या दारात आलिशान ‘जॅग्वार’, खरेदी केली ९८ लाख रुपयांची कार






