प्रतिष्ठित इंडियन प्रीमियर लीगच्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध त्याने शतकी खेळाडू करत एकहाती सामना जिंकला होता. आज (२० ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२०च्या ३८व्या सामन्यातही या धुरंधरने शानदार शतक ठोकले आहे.
दुबईच्या स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. त्यामुळे दिल्लीची सलामी जोडी पृथ्वी शॉ आणि धवन मैदानावर उतरले. पण पंजाबच्या गोलंदाजांनी शॉ, कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतसारख्या फलंदाजांना लवकरच पव्हेलिनला पाठवले.
मात्र धवनने शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहत पंजाब संघाचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ६१ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकार मारत १०६ धावांची अफलातून खेळी केली. यासह धवन हा आयपीएलच्या इतिहासात सलग २ सामन्यात शतक जडणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
आयपीएलमध्ये ५००० धावा करणारे फलंदाज
धवनने त्याच्या १२ वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत १६९ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २ शतकांसह ३९ अर्धशतके ठोकत ५०४४ धावा केल्या आहेत. यासह तो आयपीएलमध्ये ५००० धावांचा टप्पा पार करणा पाचवा खेळाडू ठरला आहे. असे असले तरी तो या यादीत चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. त्याच्याआधी विराट कोहली (५७५९ धावा) अव्वल, सुरेश रैना (५३६८ धावा) दूसऱ्या आणि रोहित शर्मा (५१५८ धावा) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यासोबतच डेव्हिड वॉर्नरही ५०३४ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नेमकं चाललंय तरी काय! करोडो रुपये देऊन संघात घेतलेले खेळाडूच ठरले सपशेल फ्लॉप
हम भी है लाईन में! धोनीने नुकताच केलेला ‘मोठा’ विक्रम लवकरच होणार रोहितच्या नावावर
ट्रेंडिंग लेख-
ऐंशीच्या दशकातील पैसा वसूल सामना.! एकट्या ‘ऍलन लॅम्ब’ यांनी वेस्टइंडीजच्या जबड्यातून विजय खेचला
HBD विरू : तो आला..त्याने पाहिलं..अन् त्याने जिंकलं ! भारतीय क्रिकेटचा खराखुरा ‘सुलतान’
क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले