---Advertisement---

‘मला आयसीसी स्पर्धांमध्ये खेळायला आवडते!’ स्वत: शिखर धवनने प्रकट केली इच्छा

On: शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022 8:02 PM
---Advertisement---

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेस्ट इंडिजमधील एकदिवसीय मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप केला. त्याच्याआधी इतर कोणत्याही कर्णधाराला अशी कामगिरी करता आलेली नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी धवनची पुन्हा एकदा संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली होती, परंतु आता केएल राहुलच्या पुनरागमनानंतर तो संघाचा उपकर्णधार असेल. शिखर धवन आता टी-२० आणि कसोटी संघाचा भाग नाही, पण तो एकदिवसीय संघात परतला आहे. धवन म्हणाला की त्याला आयसीसी स्पर्धांमध्ये खेळायला आवडते आणि आता त्याचे पुढील लक्ष्य २०२३ विश्वचषक आहे.

या वर्षी टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे, परंतु धवनसाठी सध्यातरी संघात स्थान नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धवन म्हणाला की, “माझे लक्ष पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी विश्वचषकावर आहे आणि त्यासाठी मला भारतासाठी जास्तीत जास्त सामने खेळायचे आहेत. या सगळ्यामध्ये आयपीएलही आहे, त्यामुळे मला त्यात चांगली कामगिरी करायची आहे आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकदिवसीय क्रिकेटही खेळायचे आहे. जेणेकरून मी फिट राहिल.”

धवन पुढे म्हणाला की, “मला आयसीसी टूर्नामेंटमध्ये खेळायला आवडते. त्यात खेळायला मजा येते. अशा प्रकारे मी प्रत्येक स्पर्धेसाठी स्वत:ला तयार करतो. मी जेव्हा जेव्हा भारताची जर्सी घालतो तेव्हा दबाव नेहमीच असतो. पण तो दबाव कसा हाताळायचा हे मला माहीत आहे. लोकांचा पाठिंबाही कामी येतो कारण त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळते.”

दरम्यान, आता भारतीय संघा झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी शिखर धावनला संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. मात्र, भारताचा उपकर्णधार केएल राहुल संघात पुनरागमन करणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर शिखर धवनकडून नेतृत्वाची धूरा काढत केएल राहहुलकडे सोपावण्यात आली. त्यामुळे धवनचे चाहते सध्या भडकले असून सोशल मिडीयावर बीसीसीआय विरुद्ध जोरदार मीम्स व्हायरल होत आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘रोहित अन् विराटपेक्षा सध्या भारताला हार्दिकची जास्त गरज आहे!’ माजी दिग्गजाचे विचित्र विधान

कर्णधार म्हणून राहुलपेक्षा वरचढ धवन! आकडेवारीत गाठलयं ‘शिखर’

‘एका हंगामात ४०० धावा करूनही संधी मिळत नसेल तर…’, संघनिवडीवरून नितीश राणा निराश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---