भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज शिखर धवन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. चाहत्यांसाठी धवन नेहमीच नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेली अशीच एक रिल सध्या तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो स्वतःसाठी मुलगी शोढण्याची मगाणी करताना दिसत आहे.
शिखर धवन (Shikhar Dhawan) सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात भारतीय संघासाठी खेळत नाहीये. त्याने भारतासाठी शेवटची मालिका झिम्बाब्वेविरुद्ध खेळली होती. धवन भारताचा मोठा खेळाडू असला आणि त्याने संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली असली, तरी सध्या तो फक्त एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळताना दिसत आहे. यावर्षीचा आशिया चषक टी-२० फॉरमॅटमध्ये खेळला जात असून याच कारणास्तव त्याला संघात सहभागी केले गेले नाही, असा अंदाज काहीजण वर्तवत आहेत. दरम्यान, त्याने एक नवीन रिल शेअर केली आहे, जी खूपच मजेशीर आहे.
माझ्यासाठी मुलगी शोधा – धवन
अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केलेल्या या रिलमध्ये धवनसोबत त्याचा पेट डॉग दिसत आहे. धवन व्हिडिओत त्याच्यासाठी मुलगी शोधण्याची मागणी करत आहे. तो त्याच्या पेडसोबत खाली झोपलेला दिसत आहे. धवन म्हणतो की, “आता वेळ आली आहे मित्रांनो. आपापसातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र या आणि माझ्यासाठी मुलगी शोधा. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.” रिलच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, होय मित्रांनो शेधा मग आता.
https://www.instagram.com/reel/ChucDsdq8hZ/?utm_source=ig_web_copy_link
धवनचा हा मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असला, तरी अनेकजण त्याचे हे बोलणे गांभीर्याने घेत आहेत. याचे कारण म्हणजे धवन सध्या सिंगल आहे. मागच्या वर्षी त्याचने पत्नी आयशा मुखर्जी हिच्यासोबत घटस्फोट घेतला होता. या दोघांमधील वाद मोठ्या काळापर्यंत माध्यांमध्ये चर्चेत होता. आठ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर अखेर मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या दोघांनी घटस्फोट घेतला. आयशाचा हा दुसरा घटस्फोट असून धवनसोबत लग्न करण्यापूर्वी तिला दोन मुले होते. धवन आणि आयशाला देखील झोरावर नावाचा एक मुलगा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पुन्हा एकदा सचिन करणार टीम इंडियाचे नेतृत्व! ‘या’ स्पर्धेतून करतोय कमबॅक
अल्टिमेट खो खो स्पर्धेत राजस्थान वॉरियर्सला नमवून गुजरात जायंट्सचा विजयी समारोप
सुनील पूर्णपात्रे यांची सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड