लंडन। रविवारी(9 जून) 2019 विश्वचषकातील 14 वा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडला. द ओव्हल मैदानावर पार पडलेला हा सामना भारताने 36 धावांनी जिंकत या विश्वचषकातील सलग दुसरा विजय मिळवला. भारताच्या या विजयात सलामीवीर फलंदाज शिखर धवनने शतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.
शिखरने या सामन्यात 109 चेंडूत 117 धावांची शतकी खेळी केली. यात त्याने 16 चौकार मारले. हे शतक त्याने 95 चेंडूत पूर्ण केले होते. तसेच हे त्याचे वनडे कारकिर्दीतील 17 वे तर वनडे विश्वचषकातील तिसरे शतक आहे.
त्याचबरोबर शिखरचे हे शतक भारताचे वनडे विश्वचषकातील एकून 27 वे शतक ठरले आहे. त्यामुळे भारताच्या नावावर वनडे विश्वचषकात सर्वाधिक शतके करण्याचा विश्वविक्रम झाला आहे. हा विश्वविक्रम करताना भारताने ऑस्ट्रेलियाच्या 26 शतकांना मागे टाकले आहे.
भारताची ही 27 शतके एकूण 13 खेळाडूंनी केली आहेत. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विश्वचषकात सर्वाधिक 6 शतके केली आहेत. तर सौरव गांगुलीने 4 शतके केली आहे. तसेच वनडे विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक शतके करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये आता शिखर सचिन आणि गांगुलीच्या पाठोपाठ 3 शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
त्याचबरोबर राहुल द्रविड, विराट कोहली, विरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी 2 शतके विश्वचषकात केली आहेत, तर सुनील गावस्कर, अजय जडेजा, विनोद कांबळी, कपिल देव, सुरेश रैना आणि युवराज सिंग यांनी प्रत्येकी 1 शतक केले आहे.
या संघांनी केली आहेत वनडे विश्वचषकात सर्वाधिक शतके –
27 शतके – भारत
26 शतके – ऑस्ट्रेलिया
23 शतके – श्रीलंका
17 शतके – विंडीज
15 शतके – न्यूझीलंड
14 शतके – दक्षिण आफ्रिका / पाकिस्तान/ इंग्लंड
6 शतके – झिम्बाब्वे
5 शतके – आयर्लंड
4 शतके – नेदरलँड्स
3 शतके – बांगलादेश
1 शतक – कॅनडा/ स्कॉटलँड/संयुक्त अरब अमिराती
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बाPhoto Courtesy: Twitter/ BCCIतम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–मोठी बातमी – युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची केली घोषणा
–व्हिडिओ: …म्हणून कर्णधार कोहलीने मागितली स्टिव्ह स्मिथची माफी, जाणून घ्या कारण
–कोहलीची खिलाडूवृत्ती! स्मिथची निंदा करण्याऐवजी चाहत्यांना सांगितले कौतुक करा, पहा व्हिडिओ