भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज शिखर धवन त्याच्या मजेशीर स्वभावासाठी ओळखला जातो. त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध नुकत्याच खेळलेल्या एकदिवसीय मालिकेत भारताचे नेतृत्व केले. मात्र, रोहित शर्माने संघात पुनरागमन केल्यानंतर धवनला संघातून पुन्हा एकदा बाहेरची वाट दाखवली गेली आहे. सध्या त्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओत धवन त्याचा शेफ कबीर सुट्टीवर जाऊ नये यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.
शिखर धवन (Shikhar Dhawan) नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे मजेशीर व्हिडिओ तयार करत असतो. वेस्ट इंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने ०-३ (क्लीन स्वीप) अशा अंतराने जिंकली आहे. भारताला हे यश मिळवून दिल्यानंतर धवनने पुन्हा एकदा एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत पाहिले जाऊ शकते की, त्याचा शेफ सुट्टीवर चालला आहे, परंतु धवन मात्र त्याला रोखण्याच्या प्रयत्नात आहे. शेवटचा पर्याय म्हणून धवन जमिनीवर झोपतो आणि कबीरला म्हणतो की, “जायचे असेल, तर माझ्या मृतदेहावरून जा.”
धवनने एवढा प्रयत्न करून देखील काही फायदा होत नाही. शेवटी त्याचा शेफ कबीर ठरल्याप्रमाणे सुट्टीवर जातो. व्हिडिओत धवनने बॉलिवुड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा एक प्रसिद्ध डायलॉग वापरला आहे. चाहत्यांकडून व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केलेल्या या पोस्टवर एका दिवसात अडीच लाखापेक्षा अधिक लाईक्स आल्या आहेत.
https://www.instagram.com/reel/CgrtBfspuG2/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, धवनच्या नेतृत्वात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेचा विचार केला, भारताने जबरदस्त प्रदर्शन केले. पहिल्या सामन्यात ३ धावांनी, दुसऱ्या सामन्यात २ विकेट्सने, तर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ११९ धावांनी भारताने विजय मिळवला होता. सध्या उभय संघात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे, पण धवन ही मालिका खेळत नाहीये. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाने पहिला टी-२० सामना जिंकून ०-१ अशी आघाडी घेतली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
जसप्रीत बुमराह करतोय सुट्टी एन्जॉय! पत्नी संजनासोबतचा रोमँटिक फोटो झाला व्हायरल
ना पाऊस ना वारा, तरीही भारत-विंडिज सामना लेट होणार, कारण वाचून हसून लोटपोट व्हाल
‘गोल्डन बॉय’ अचिंता म्हणतोय, “माझ्या आसपासही कोणी नव्हते,..”