---Advertisement---

केवळ २७ धावांवर बाद होऊनही हेटमायरने जिंकली लाखो मने, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल स्तुती

---Advertisement---

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात २ वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या संघाला टी-२० विश्वचषक २०२१ च्या हंगामात मात्र चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. वेस्ट इंडिज संघाने या स्पर्धेत ५ सामने खेळले, ज्यापैकी त्यांना १ सामन्यात विजय मिळवता आला. शनिवारी (६ नोव्हेंबर) वेस्ट इंडिज संघाने सुपर-१२ फेरीतील शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. यादरम्यान वेस्ट इंडीजच्या फलंदाजाने फलंदाजी करताना असे काही कृत्य केले, जे पाहून कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना अभिमान वाटला असेल.

तर झाले असे की, जोश हेजलवुडच्या चेंडूवर शिमरोन हेटमायर बाद होता. परंतु त्याने पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली नाही आणि ड्रेसिंग रुमची वाट धरली. शिमरोन हेटमायरची ही खिलाडूवृत्ती पाहून सोशल मीडियावर त्याचे भरपूर कौतुक केले जात आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ही घटना वेस्ट इंडिज संघाची फलंदाजी सुरू असताना १३ व्या षटकात घडली. या षटकातील ५ व्या चेंडूवर जोश हेजलवुडने बाऊंसर चेंडू टाकला, ज्यावर शिमरोन हेटमायरने लेग साईडच्या दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न फसला आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात गेला. त्यावेळी यष्टिरक्षकाने जोरदार अपील केली. परंतु पंचांनी बाद देण्यापूर्वीच शिमरोन हेटमायरने ड्रेसिंग रूमची वाट धरली होती. ज्यामुळे पंचांनी देखील त्याला बाद घोषित केले.

ऑस्ट्रेलिया संघाचा जोरदार विजय तर वेस्ट इंडिज संघ स्पर्धेच्या बाहेर
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिज संघाकडून प्रथम फलंदाजी करताना कायरन पोलार्डने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तर एविन लुईसने २९ आणि शिमरोन हेटमायरने २७ धावांची खेळी खेळी. या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाला २० षटक अखेर ७ बाद १५७ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना डेविड वॉर्नरने सर्वाधिक ८९ धावांची खेळी केली. तर मिचेल मार्शने ५३ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने ८ गडी राखून जोरदार विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

संपूर्ण स्पर्धा गाजवून नॉकआऊट सामन्यात न्यूझीलंड ठरलाय फेल, विराटसेनेचं सेमीफायनल गाठणं निश्चित!

न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान सामना टाय किंवा अनिर्णीत राहिल्यास काय? घ्या जाणून गणिते

टी२० विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार भावूक; म्हणाला, ‘एका युगाचा अंत झाला’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---