पुणे | क्रीडा स्वयंसेवी संस्था असलेल्या लक्ष्यच्या ग्रॅंड मास्टर विदीत गुजराथी(बुध्दीबळ,नाशिक), प्रार्थना ठोंबरे(टेनिस, सोलापुर), स्वप्निल कुसळे(रायफल नेमबाज, कोल्हापुर) व विक्रम खुराडे(कुस्ती, कोल्हापुर) यांना महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण विभागातर्फे देण्यात येणारा शिव छत्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. 17 फेब्रुवारी 2018 रोजी मुंबई येथे या पुरस्कारांचे वितरण झाले.
लक्ष्यचे अध्यक्ष विशाल चोरडीया म्हणाले, संस्थेसाठी ही अतिशय अभिमानास्पद क्षण आहे . खेळाडू, प्रशिक्षक व पालकांनी घेतलेल्या महिनतीचे हे फळ आहे. हे सर्व खेळाडू लहान शहरे आणि गावातील आहेत आम्ही खरोखरच समाधानी आहोत की आम्ही तळागाळातून योग्य प्रतिभा ओळखू शकलो. या खेळाडूंना योग्या वेळी पाठिंबा देता आला. ही तर केवळ सुरूवात आहे. अजून खूप यश त्यांना मिळवायचे आहे असे ते म्हणाले.
बुध्दिबळ खेळामध्ये नाशिकच्या ग्रॅंड मास्टर विदीत गुजराथी याला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लक्ष व भारत फोर्ज यांचा पाठिंबा लाभलेला विदीत जोगतीक क्रमवारीत 34व्या स्थानी, आशियायी क्रमवारीत 9व्या तर राष्ट्रीय क्रमवारीत 3-या स्थानावर आहे. 2013 मध्ये त्याला ग्रॅंड मास्टर किताब मिळवला.2016 मध्ये दोहा येथे झालेल्या विश्व रैपिड बुद्धिबळ स्पर्धेत विश्वनाथन आनंद विरूध्द खेळताना 8 विजय, 3 बरोबरी व 4 पराभव मिळवत 9.5 गुणांसह 8वे स्थान पटकावले होते.
टेनिस खेळामध्ये बार्शी सोलापूरच्या प्रार्थना ठोंबरेला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लक्ष्य व भारत फोर्ज यांचा पाठिंबा असलेली प्रार्थने 2014 साली इन्चोन येथे झालेल्या आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये महिलांच्या दुहेरी गटात सानिया मिर्झाच्या साथीत कांस्य पदकाची कमाई केली होती. 2015 साली केरळ येथे झालेल्या 34व्या राष्ट्रीय स्पर्धेत एकेरी गटीत एक रौप्य, संघिक गटात व दुहेरी गटात 2 कांस्य पदकांची कमाई केली.
नेमबाजी प्रकारात कोल्हापुरचा रयफल शुटर स्वप्निल कुसळे याला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लक्ष्य व रावेतकर ग्रुप यांचा पाठिंबा लाभलेल्या स्वप्निलने 2017 साली केरळ येथे पार पडलेल्या 61व्या राष्ट्रीय नेमबाज अजिंक्यपद स्पर्धेत 50मीटर थ्री पोझीशन प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. याशिवाय थ्री पोझीशन सिविलीयन प्रकारात रोप्य तर 1163 गुणांसह सांघिक कांस्य पदक पटकावले. स्पर्धेच्या अंतिम लढतीत 457 गुणांसह नविन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. 2017 मध्ये गोल्ड कोस्ट येथे आयोजीत राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत स्वप्निलने 50प्रोन प्रकारात 619.1 गुणांसह कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेत गगन नारंगने रौप्य पदक मिळवले होते.
ग्रिको रोमन कुस्ती प्रकारात कोल्हापुरच्या विक्रम खुराडेला पुरस्कार जोहीर करण्यात आला आहे. लक्ष्य व नांदेड सिटी यांच्या पाठिंबा लाभलेल्या विक्रमने फेब्रुवारी 2018 मध्ये झालेल्या आशियायी अजिंक्यापद स्पर्ध्यांच्या निवड चाचणी स्पर्धेत विजय मिळवला. ग्रिको रोमन कुस्ती प्रकारात 63 किलो वजनी गटात महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. याशिवाय प्रो रेस्टलींग लीग मध्ये मुंबई मराठी संघातही त्याचा सहभाग होता.