---Advertisement---

कुंडल राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवशक्ती, राजमाता जिजाऊ, उत्कर्ष, तरुण मराठा संघ बादफेरीत

On: शनिवार, जानेवारी 11, 2020 6:01 PM
---Advertisement---

कुंडल येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत दुसऱ्यादिवशी साखळी सामने झाले. महिला गटातून शिवशक्ती महिला संघ, शिव ओम, राजमाता जिजाऊ, सुवर्णयुग स्पोर्ट्स, जय हनुमान बाचणी, एम एच स्पोर्ट्स तर पुरुष गटातून बाबुराव चांदेरे सो., राजारामबापू व्या. कासेगाव, तरुण मराठा व्या., उत्कर्ष, सम्राट व्या. संघानी बादफेरीत प्रवेश मिळवला.

पुरुष गटात जय बजरंग रोहा विरुद्ध अण्णासाहेब डांगे यांच्यात चुरशीची लढत झाली. जय बजरंग रोहा संघाने २९-२८ अशी बाजी मारली. राकेश गायकवाड, अभिषेक शिंदे यांनी चांगला खेळ केला. तसेच जय बजरंग संघाने अभिजीत कदम व्या. संघावर विजय मिळवला आहे. या गटातील दोन महत्वपूर्ण लढती बाकी आहेत.

ब गटात तरुण मराठा सांगलीवाडी संघाने २५-२० असा छावा कोल्हापूर संघाचा पराभव करत बादफेरीत प्रवेश मिळवला. विजय क्लब विरुद्ध छावा कोल्हापूर ही महत्वपूर्ण लढत बाकी आहे. अ गटात बाबुराव चांदेरे सो संघ विरुद्ध अंकुर स्पोर्ट्स यांच्यात झालेला सामना २४-२४ बरोबरीत राहिला. तर अंकुर स्पोर्ट्सला राजारामबापू व्या मंडळ कासेगावकडून पराभवाचा धक्का बसला.

महिला गटात शिवशक्ती महिला संघाने ४२-२२ असा शिव ओम पुणे संघावर विजय मिळवत बादफेरीत प्रवेश केला. अ गटातून शिवशक्ती व शिव ओम संघानी बादफेरीत प्रवेश निश्चित केला. ब गटात राजमाता जिजाऊ पुणे संघाने विवेक कबड्डी संघाचा ४०-१२ असा पराभव करत बादफेरी गाठली.

ड गटात द्रोणा स्पोर्ट्सने ५२-२९ असा तरुण मराठा सांगली संघाचा पराभव केला. तर सुवर्णयुग पुणे संघाने जय हनुमान चरी रायगड संघाचा ३४-०३ असा धुव्वा उडवला. महिलांच्या गटात दोन महत्वपूर्ण लढती बाकी आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---